Amol Palekar 76th Birthday: उत्तम दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेले हरहुन्नरी अमोल पालेकर (Amol Palekar) यांचा आज जन्मदिवस... 24 नोव्हेंबर 1944 मध्ये त्यांचा जन्म झाला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते बँकेत क्लर्क म्हणून नोकरी करत होते. त्यानंतर रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आतापर्यंत असंख्य नाटकांत, मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम केले. ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाटकांत काम केले. इतकच नव्हे तर सत्यदेव दुबे यांच्या मराठी चित्रपटातूनच त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
1971 साली आलेल्या 'शांतता कोर्ट चालू आहे' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची अनेकांना प्रचंड भावली.हेदेखील वाचा- Amruta Khanvilkar Birthday: अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा हा ग्लॅमरस लूक पाहून विसरून जाल बॉलिवूडच्या तारकांना, See Pics
पाहा या सिनेमाची एक झलक
मध्यम वर्गीय घरातून आलेल्या अमोल पालेकर यांनी आपल्या करिअरमध्ये आलेल्या प्रत्येक भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. मराठीनंतर त्यांनी हिंदीतही पदार्पण केले आहे. रजनीगंधा हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर अमोल पालेकरांनी छोटीसी बात, चितचोर, घरोंदा, नरम नरम, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. 1979मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. 1982 मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला. मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केली. इतकंच नव्हे तर त्यांनी राणी मुखर्जी आणि शाहरुख यांचा 'पहेली' या चित्रपट दिग्दर्शित केला. 2006 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.
अशा या हरहुन्नरी कलाकाराला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!!