Pravin Tarde With Amol Dhavade | Photo Credits: Pravin tarde FB

मराठी कलाविश्वामध्येही सध्या कोरोना वायरसमुळे अनेक कलाकार, तंत्रज्ञ बेजार झाले आहेत. काही कलाकारांनी कोरोनाशी दोन हात करत त्यावर विजय मिळवला आहे पण अभिनेते अमोल धावडे यांची मात्र झुंज अपयशी ठरली आहे. अमोल धावडे यांचे मित्र प्रविण तरडे यांनी फेसबूक पोस्ट च्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 15 दिवसांत कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला असं सांगत जुन्या मित्राला गामावल्याचं दु:ख शेअर केले आहे. दरम्यान अमोल धावडे हे प्रविण तरडे हे जुने मित्र होते. कॉलेज जीवनापासून त्यांची मैत्री होती. प्रवीण तरडेंच्या प्रत्येक सिनेमामध्ये एक सीन तरी अमोल साठी लिहायचो असे त्यांनी या पोस्ट मध्ये लिहले आहे.

दरम्यान 1996 साली“आणखी एक पुणेकर ” या एकांकीकेत पहिला डायलॅाग अमोल यांनी प्रवीण साठी म्हटला होता आणि तिथपासून ही साथ सुरू झाली होती. त्यानंतर देऊळबंद, मुळशी पॅटर्न आणि अगदी आता प्रविण तरडेंच्या आगामी बहुप्रतिक्षित सरसेनापती हंबीरराव सिनेमापर्यंत त्यांची एकमेकांना साथ होती. पण कोरोनाने अमोल वर घाला घातला आणि ही मैत्री तुटली. Sarsenapati Hambirrao New Poster: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या चित्रपटात पिळदार शरीरयष्टीची झलक दाखवणारा कोण आहे हा अभिनेता?

प्रविण तरडे यांची भावूक पोस्ट

प्रविण तरडे दरवर्षी 11 मे ला अमोलच्या बर्थ डे ला त्याच्या डायलॉगच्या डबिंगने सिनेमाच्या कामाला सुरूवात करत असत. दुर्देवाने ”बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव ”हा अमोलचा शेवटचा मेसेज होता आणि तेच आता झाल्याने प्रविण तरडे भावनाविवश झाल्याचं पहायला मिळालं. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमोल धावडे यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.