Girlfriend Movie LoveStory Song: अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमातील 'लव्हस्टोरी' हे धमाल गाणं रसिकांच्या भेटीला!
LoveStory Song (Photo Credits: Youtube)

Girlfriend Marathi Movie Song: अमेय वाघ (Amey Wagh) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या या फ्रेश जोडीचा आगामी सिनेमा गर्लफ्रेंड (Girlfriend) मधील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'लव्हस्टोरी' (Lovestory) असे हे गाणे असून क्षितिज पटवर्धन या गाण्याचा गीतकार आहे. जसराज जोशी आणि श्रृती आठवले यांनी हे गाणे गायले असून ऋषिकेश, सौरभ आणि जसराज (Hrishikesh - Saurabh - Jasraj) यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

क्षितिज पटवर्धन याच्या हटके शब्दांनी नटलेल्या या गाण्यात नचिकेत-अलिशाची धम्माल लव्हस्टोरी दाखवण्यात आली असून यात आपल्याला त्यांचा डान्सही पाहायला मिळत आहे. अमेय वाघ आणि रसिका सुनील यांचं 'गर्लफ्रेंड' सिनेमातील पहिलं धमाकेदार गाणं (Watch Video)

पहा व्हिडिओ:

'गर्लफ्रेंड' सिनेमात अमेय वाघ नचिकेत ही भूमिका साकारत आहे. तर सई ताम्हणकर नचिकेतच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत म्हणजेच अलिशा हिच्या भूमिकेत दिसणार आहे. उपेंद्र सिधये दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती रणजित गुगळे आणि अनिश जोग यांनी केली असून 26 जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र या सिनेमात अमेय-सईची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.