डॅडी अरुण गवळी झाले आजोबा! अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांना कन्यारत्नाचा लाभ
Akshay Waghmare-Yogita Gawli (Photo Credits: Instagram)

Akshay Waghmare-Yogita Gawali Blessed with Baby Girl: अभिनेता अक्षय वाघमारे (Akshy Waghmare) आणि गँगस्टर अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी (Yogita Gawli) हे दोघे आज एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत. सोशल मिडियाद्वारे त्यांनी ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्नाचा लाभ झाला असून त्यांच्या चाहत्यांसह त्यांचा मित्रपरिवार त्या दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. मुंबईच्या दादर येथील एका नर्सिंग होममध्ये तिचा जन्म झाला. तर दुसरीकडे गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी आजोबा झाले आहेत.

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचे वर्षभरापूर्वी 8 मे 2020 रोजी विवाहसोहळा संपन्न झाला होता. या लग्नासाठी आधीच पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार लॉक डाऊनच्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन होत हा विवाह सोहळा पार पडला. याआधी योगिता आणि अक्षयच्या हळदीच्या, अक्षयच्या मेहेंदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.हेदेखील वाचा- अरुण गवळीची कन्या योगिता गवळी व अभिनेता अक्षय वाघमारे अडकले विवाह बंधनात; लॉक डाऊनमध्येही थाटामाटात साजरा झाला सोहळा (See Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

त्यानंतर काही महिन्यांतच योगिताची गोड बातमी चाहत्यांना मिळाली होती. तिच्या डोहाळं जेवणाचे फोटोज आणि व्हिडिओज देखील सोशल मिडियावर व्हायरल होते.

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेसांना ओळखत होते, त्यांच्यात चांगली मैत्रिही होती. आता या मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’अशा काही मराठी चित्रपटांमध्ये अक्षय वाघमारे याने अभिनय केला आहे.