Shubhangi Gokhale FB Account hacked: अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक, सायबर सेलमध्ये दाखल केली तक्रार
Shubangi Gokhale (Photo Credit - FB)

मराठी प्रसिध्द अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांचे फेसबुक (Facebook) अकाऊंट हॅक (Hacked) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतःह  शुभांगी गोखले यांनीच फेसबुकवर पोस्ट लिहित याविषयी माहिती दिली आहे. “पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. प्लीज ओपन करु नका” असं आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट (Post) मध्ये केले आहे. दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून सायरब सेलने तपास सुरु केला आहे.

शुभांगी गोखले यांची फेसबुक पोस्ट

हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं...हा ट्रॅप आहे यात अडकू नका.

शुभांगी गोखलेंच्या अकाऊंटमधून अनेकांना मेसेज जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक असून तुझे अश्लील फोटोज या लिंकवर आहेत, असा मेसेज जात आहे. यासंदर्भात शुभांगी गोखले यांनी सायबर सेलचे प्रमुख रश्मी करंदीकर यांना तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. ( हे ही वाचा उमेश आणि प्रियाचा भन्नाट डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.)

छोट्या पडद्यावरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने कमी कालावधीत प्रेंक्षकांची मन जिंकुन घेतली. अशातच या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी अर्थात शुभांगी गोखले मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. मालिकेत आता शुभांगी गोखलेंच्या जागी कोण भुमिका स्वीकारेल हे लवकरच दिसुन येईल.