दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा, कन्या रीमा अमरापूरकर यांचा 'पुरुषोत्तम' प्रेक्षकांच्या भेटीला
Purushottam Marathi Movie

आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटवणारे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Actor Sadashiv Amrapurkar) यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर (Sunanda Amrapurkar) आणि ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर (Ketaki Amrapurkar) सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. 'पुरुषोत्तम' (Purushottam Marathi Movie) असे या चित्रपटाचे नाव आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी केले आहे. समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याची गोष्ट या सिनेमातून सांगण्यात आली आहे. चित्रपटाची निर्मिती निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे. (हेही वाचा, Nagin Dance Song: आदर्श शिंदे च्या आवाजात 'कागर' सिनेमातील नवं दमदार गाणं 'नागीण डान्स' (Watch Video))

'पुरुषोत्तम' या सिनेमाचे नुकतेच सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमात नंदु माधव यांची प्रमुख भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा 'पुरूषोत्तम' हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.