'मुलगी झाली हो' मधील एक्झिट नंतर अभिनेते किरण माने यांची आगामी 'रावरंभा' सिनेमात वर्णी
Kiran Mane | PC: Facebook

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची स्टार प्रवाह वरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho)या मालिकेतून हाकालपट्टी झाल्यानंतर त्यांची आता नव्या सिनेमामध्ये वर्णी लागली आहे. किरण माने यांनी सोशल मीडीयात पोस्ट करून ही माहिती दिली आहे. अनुप जगदाळे (Anup Jagdale) दिग्दर्शित 'रावरंभा' (Ravranbha) या आगामी ऐतिहासिक प्रेमकहाणीवर बेतलेल्या मराठी सिनेमा मध्ये किरण माने झळकणार आहेत.

मागील काही दिवसांपासून किरण माने हे नाव चर्चेमध्ये आहे. त्यांनी सोशल मीडीयामध्ये केलेल्या पोस्ट आणि घेतलेल्या राजकीय भूमिकांवरून त्यांना मालिकेतून हाकलल्याची बाजू त्यांनी मांडली आहे तर स्टार प्रवाहने वारंवार तंबी देऊनही सेटवर चूकीचे वर्तन केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढल्याचं म्हटलं आहे. यामध्ये किरण माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. नक्की वाचा: साॅरी उद्धवजी.. मी किरण माने, मला तुमची माफी मागायचीय!, अभिनेत्याने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली.

किरण माने यांची पोस्ट

रावरंभा या चित्रपटातून ऐतिहासिक प्रेमकहाणी रूपेरी पडद्यावर साकरली जाणार आहे. संजय जाधव या सिनेमाचे कॅमेरामॅन असून दिग्दर्शनाची जबाबदारी अनुप जगदाळे यांच्यावर आहे. अद्याप या सिनेमातील अन्य कलाकारांची, मुख्य कलाकारांची नावं समजू शकलेली नाहीत. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त कर्जत येथील एनडी स्टुडिओ मध्ये पार पडला आहे.