33 Years Of Ashi Hi Banva Banvi: अभिनेता Swwapnil Joshi ते Ashwini Bhave  कडून सिनेमाशी निगडीत खास आठवणी सोशल मीडीयात शेअर
Ashi Hi Banva Banvi | PC: Instagram

अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banva Banvi) हा मराठी सिनेसृष्टीतील अजरामर आणि खळखळून हसवणारा सिनेमा आहे. आज या सिनेमाला  रिलीज होऊन 33 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या सिनेमाची जादू कायम आहे. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाचा भाग होता. सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा सुपर डुपर हीट ठरला आहे. या सिनेमातील अनेक डायलॉग्स आजही आठवून या सिनेमाच्या प्रेक्षकांना हसू आवरता येत नाही. आबाल वृद्ध फॅन्स असलेल्या या सिनेमाच्या आठवणी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) आणि अश्विनी भावे (Ashwini Bhave)  यांनी देखील शेअर केल्या आहेत. नक्की वाचा:  अशी ही बनवाबनवी या सिनेमाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

दरम्यान केवळ जोडप्यांनाच भाडेकरू ठेवणार या अटीमुळे चार मित्रांना परिस्थितीसमोर नमतं घेतं काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्यामधून घडणारी Situational Comedy ही 'अशी ही बनवाबनवी' ला मिळालेल्या तुफान यशामध्ये मोलाचा वाटा उचलते. आज स्वप्नील जोशीने 33 वर्षांपूर्वी आह रिलिज झालेल्या 'अशी ही बनवाबनवी' ची वृत्तपत्रातील जाहिरात शेअर केली आहे. तर अश्विनी भावे यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा डायलॉग शेअर केला आहे.

स्वप्नील जोशी पोस्ट  

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अश्विनी भावे पोस्ट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील डायलॉग्स प्रमाणेच या सिनेमातील गाणी देखील सुपरहीट ठरली होती. या सिनेमात सचिन पिळगावकर आणि लक्ष्मिकांत बेर्डे यांनी साकरलेली स्त्री पात्र देखील कौतुकास पात्र ठरली आहेत. आजही पुरूषाने स्त्री पात्रं साकारण्यामध्ये, त्यामधील अभिनयात स्त्रियांप्रतीचा आदर जपण्यामाध्ये त्यांच्या भूमिकेचा दाखला दिला जातो.