सलिल जामदार ने स्टार किड्स वर निशाणा साधत बनवला 'हा' सैराट व्हिडीओ, झिंगाट चं हे टोमणा व्हर्जन ऐकून,हसून व्हाल हैराण (Watch Video)
सलीम जामदार (Photo Credits: Youtube)

मराठमोळा युट्युबर सलील जामदार (Saleel Jamdar) याने नुकताच बॉलिवूड च्या स्टार किड्स (Starkids)  वर निशाणा साधत एक भन्नाट कॉमेडी व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनेल वरून पोस्ट केला होता. या व्हिडीओ ला आतापर्यंत 15 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)  याच्या दुर्दैवी निधनानंतर बॉलिवूड मधील नेपोटीझम (Nepotism) हा पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. याच परिस्थितीवर भाष्य करत सलील ने कॉमेडी अंदाजात स्टार किड्स ना टोलावले आहे. सैराट (Sairat) च्या रिमेक धडक (Dhadak)  सिनेमातील झिंगाट (Zingaat) या गाण्याची पॅरॉडी करत सलील यामध्ये एक एक करून बॉलिवूड मधील अनेक मुद्द्यांवर उपरोधिक भाष्य करत आहे. Suicide or Murder? या टायटलने सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनप्रवासावर बनणार सिनेमा; पहा सिनेमाचे First Poster

या व्हिडीओ मध्ये सलील ने सुरुवातीला कशा प्रकारे आपण स्टार किड नसल्याने हिरोच्या भूमिकेसाठी आपल्याला विचारातही घेतले जात नाही हे सांगितले आहे, अखेरीस टॅलेंट असूनही केवळ बॅकग्राउंड नसल्याने आपल्याला छोट्या भूमिका कराव्या लागतात असे म्हंटले आहे. तो काळ जेव्हा तुमचं टॅलेंट बघून काम मिळत होता तो केव्हाच संपला आहे आता केवळ गॉड फादर किंवा फिल्म बॅकग्राउंड असणे गरजेचे आहे. साध्या कलाकारांना घेऊन सैराट सिनेमाने 100 कोटीहून अधिक कमाई केली पण त्याचा रिमेक करताना स्टार किडना प्राधान्य दिलं गेलं यावर सुद्धा सलील ने भाष्य केले आहे.

सलील जामदार व्हिडीओ पहा

दरम्यान, या गाण्यात आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपूर, जान्हवी कपूर या सर्वांना टोला लगावला आहे. ही परिस्थती जरी कॉमेडी अंदाजात मांडली असली तरी त्यामागे किती तथ्य आहे हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.