मराठी कलाकार प्रथमेश परब झळकणार 'या' बॉलिवूडच्या चित्रपटात
मराठी कलाकार प्रथमेश परब ( फोटो सौजन्य- फेसबुक )
मराठी चित्रपट टाइमपास, लालगबाची राणी, 35 टक्के काटावर पास अशा विविध चित्रपटातून झळकलेला प्रथमेश परब लवकरच बॉलिवूडमधील एका चित्रपटात झळणार आहे. तर मराठी कलाकारांचे बॉलिवूडमध्ये होणारे पदार्पण ही गर्वाची बाब असल्याचा आनंद व्यक्त होत आहे.
प्रथमेश परबचा मराठी सिनेमा 'टाइमपास' हा सिनेमा सुपर हिट ठरला होता. त्यानंतर त्याला अजन देवगण सोबत दृश्यम या चित्रपटात काम करण्यास संधी मिळाली. तर आता प्रथमेश त्याचा आगामी चित्रपट 'अन्य' या बॉलिवूडच्या चित्रपटात पुन्हा झळकणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर या चित्रपटाची राजकीय- रोमँटिक थ्रिलर अशी कथा असणार आहे. तसेच सिम्मी लिखित आणि दिग्दर्शित प्रथमेशचा हा तीसरा बॉलिवूड चित्रपट आहे. मात्र प्रथमेश एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहे. मराठी दिग्गज कलाकार अतुल कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

 'अन्य' हा चित्रपट मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील प्रथमेशचे डायलॉग ऐकण्यासारखे आहेत. तर रायमा सेन, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, गोविंद नामदेव आणि कृतिका देव हे सहकलाकार म्हणून काम करणार आहेत.