Photo Credit- X

Shah Rukh Khan Receives Death Threat: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला अटक (Shah Rukh Khan Death Threat) करण्यात आली आहे. आरोपीने 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज रायपूर येथून आरोपीला अटक केली. फैजल खान (Faizal Khan)असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी आज मंगळवारी ही कारवाई करत फैजल खान याला त्याच्या रायपूरमधील घरातून पकडले.

दोन तास चौकशी

आरोपी फैजलची पोलिसांनी दोन तास चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने धमकीच्या कॉल्समागे आपल्याविरुद्ध कट असल्याचे सांगितले. कदाचित कोणीतरी त्याच्या फोनचा गैरवापर केला असावा, असे आरोपीने म्हटले. (हेही वाचा-Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी)

फैजल हा मूळचा राजस्थानचा आहे. बिश्नोई समुदायाशी भावनिक रित्या जोडला गेला आहे. हरणांचे संरक्षण करणे हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. फैजल ने या आधी शाहरुख खानच्या 1994 मध्ये आलेल्या ‘अंजाम’ चित्रपटातली हरणांच्या शिकारीवरील एका डायलॉगवर आक्षेप घेतला होता. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 308(4) हत्येची धमकी किंवा गंभीर दुखापत करण्यासह खंडणीशी संबंधित, आणि 351(3)(4) गुन्हेगारी धमकीचा समावेश कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कधी मिळाली धमकी?

सात दिवसांपूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:21 वाजता वांद्रे पोलिसांना एक फोन आला, ज्यामध्ये आरोपीने शाहरुख खान मन्नत बँड स्टँड येथे राहतो, बरोबर? असे म्हटले. आरोपीने प्रथम शाहरुखचे लोकेशन कन्फर्म केले. त्यानंतर त्याने 50 लाख रुपये दिले नाहीत तर शाहरुखला जीवे मारू, असे धमकावले. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. धमकीच्या कॉलमागील खरा गुन्हेगार कोण याचा तपास केला जात आहे.