बॉलिवूडची धक धक गर्ल, जिच्या स्माईलवर करोडो लोक फिदा आहेत, जिच्या नृत्याच्या एका ठुमक्यावर चाहते जीव ओवाळून टाकतात, जिचा अभिनय, संवाद यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला लोकप्रियता मिळाली अशी नन ऑदर दॅन माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचा आज वाढदिवस. माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईमधील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. तिथून आज माधुरी ज्या उंचीवर पोहचली आहे ते पाहता, माधुरीचा प्रवास किती खडतर असेल याचा अंदाज येतो.
आपल्या 34 वर्षाच्या करियरमध्ये माधुरी फार कमी वादाच्या भोवऱ्यात सापडली. इतकी मोठी अभिनेत्री असूनही माधुरीने आपले व्यक्तिमत्व चर्चा, गॉसीप, आरोप-प्रत्यारोप यांपासून दूर ठेवले होते. नाही म्हटले तर तिच्या अफेअरच्या काही चर्चा मात्र नक्कीच रंगल्या. मात्र माधुरीच्या आयुष्यात सर्वात मोठा वाद उद्भवला होता तो तिच्या विनोद खन्ना (Vinod Khanna)सोबतच्या हॉट किसिंग सीनमुळे.
तर तो माधुरीचा आठवा चित्रपट होता, दयावान (Dayavan), फिरोज खान (Feroz Khan) हे निर्माता-दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते. त्याकाळी अभिनेता विनोद खन्ना सर्वात हँडसम कलाकार समजला जात होता. त्याचे नाव ऐकले की हिरोइन्स तत्काळ त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार होत असत. दयावानमध्येही विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होता. माधुरी आणि विनोद खन्ना या दोघांनाही चित्रपटात काही इंटीमेट, बोल्ड सीन्स असणार आहेत हे माहित होते. त्यावेळी माधुरीचे वय होते 21 तर विनोद खन्ना होते 42 वर्षांचे, म्हणूनच माधुरीने यासाठी होकार दिला होता.
अखेर शूटचा दिवस उजाडला. माधुरी याबाबतीत अतिशय नर्व्हस होती, मात्र फिरोज खान यांनी तिला समजावले. शूट सुरु झाले, आणि लिप लॉक शॉटवेळी विनोद खन्ना यांचा स्वतःवरील ताबा सुटला. ते आवेशाने माधुरीला किस करू लागले, अखेर हे करतान ते इतके वाहवत गेले की त्यांनी चक्क माधुरीचा ओठांचा चावा घेतला होता. या चित्रपटात माधुरी आणि विनोद यांचे एकत्र अंघोळ करतानाचेही काही सिन्स होते. (हेही वाचा: अशी घडली माधुरी! धक धक गर्लच्या बॉलिवूड प्रवासाचा फ्लॅशबॅक)
हे सिन्स चित्रपटामधून काढून टाकावेत अशी मागणी माधुरीने फिरोज खान यांच्याकडे केली होती. मात्र या चित्रपटासाठी माधुरीला तब्बल 1 कोटी मानधन दिले गेले असल्याने त्यांनी यासाठी नकार दिला. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र या किसिंग सीनचीच चर्चा रंगू लागली. याबाबत माधुरीला आजची पश्चाताप होत आहे, आपण त्या चित्रपटासाठी होकार द्यायला नको होते असे आजही ती म्हणते. मात्र त्याच वर्षी 11 नोव्हेंबरला माधुरीचा 'तेजाब' प्रदर्शित झाला, आणि त्यानंतर माधुरीने कधीच मागे वळून पाहिले नाही.