Happy Birthday Madhuri Dixit: अशी घडली माधुरी! धक धक गर्लच्या बॉलिवूड प्रवासाचा फ्लॅशबॅक
माधुरीचे मनमोहक हास्य (Photo Credit : Instagram)

Madhuri Dixit Birthday special: अलीकडे प्रदर्शित झालेल्या कलंक (Kalank) सिनेमातून बॉलिवूडची धक धक गर्ल (Dhak Dhak Girl Madhuri Dixit) माधुरी दीक्षित हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर आपले वर्चस्व आहे हे दाखवून दिले. नव्वदीच्या शतकात जेव्हा हिरोच्या नावावर सिनेमा चालायचे तेव्हा या मराठमोळ्या मुलीने आपल्या दमदार अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी बॉक्सऑफिसवर अशी काही जादू केली की त्यानंतर कितीही दमदार स्टारकास्ट असली तरी माधुरीच्या नावाने सिनेमाला एक वेगळचं वजन मिळू लागलं. अभिनय,नृत्य आणि सौंदर्याची ही सम्राज्ञी आज वयाच्या 52 व्या वर्षात पदार्पण करत आहे.  माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला एक नजर टाकुयात माधुरी ते धक धक गर्ल पर्यंतच्या प्रवासावर..

कलेची खाण माधुरी

राजश्री या प्रख्यात सिनेमानिर्मात्या कंपनीने मुंबईतील 17 वर्षाच्या एका मराठी मुलीला अबोध या सिनेमातून 1984 साली लाँच केले, काही कारणास्तव हा सिनेमा चालला नाही पण या मुलीच्या निरागस व मधुर हास्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली, ही मुलगी म्हणजे माधुरी दीक्षित. यानंतर जेव्हा सुभाष घाई यांनी माधुरीची भेट घेतली तेव्हा ही मुळगी म्हणजे प्रत्यक्ष कलेची खाण आहे असे उदगार त्यांच्या तोंडून निघाले आणि माधुरीसाठी इंडस्ट्रीची दारं आपोआप उघडली गेली. अबोध नंतर माधुरीचे खतरों के खिलाडी,हिफाजात हे चित्रपट देखील फारशी कमाई करू शकले नाहीत पण तरीही माधुरीच्या प्रवासात कुठेच विराम लागला नाही.

 

View this post on Instagram

 

#madhuridixit

A post shared by Slave of Madhuri Dixit (@slaveofmadhuridixit) on

तेजाब ने दिलं करिअरला वळण

तेजाब सिनेमातून एक दोन तीन म्हणत माधुरीने थेट प्रेक्षकांच्या हृदयात एंट्री घेतली आजही हे गाणं वाजल्यावर कोणालाही माधुरीच्या स्टेप्स न चुकता करता येतात यातच या गाण्याचे यश दिसून येते. तेजाबमुळे माधुरीची अभिनेत्री सोबतच एक अफलातून डान्सर म्हणून ओळख निर्माण झाली. आणि इथूनच तिच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं. काहीच काळात द्यावं, त्रिदेव, किशन कन्हैया, राम लखन यासारख्या हिट चित्रपटातून माधुरी दिसून आली. या काळात माधुरीला एका सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांना तब्बल 50 लाख इतकी किंमत मोजावी लागत होती, एवढी किंमत त्यावेळी केवळ हिरोंना दिली जायची मात्र दिल, साजन, बेटा , खलनायक यासारख्या गोल्डन ज्युबली फिल्म्समुळे माधुरी हा इंडस्ट्रीमध्ये एक ब्रँड तयार झाला होता.

माधुरीची दोन वेगळी रूपं 

हम आपके है कौन आणि देवदास हे माधुरीच्या शिरपेचातले सुवर्ण तुरे आहते असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही, सलमान खान सोबत हम आपके है कौन मध्ये दिसलेली बबली, नटखट, उत्साही माधुरी आणि तिचा निळ्या साडीतला लूक चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. पण त्यानंतर आलेल्या देवदास मध्ये मात्र माधुरीचा एक वेगळाच रूप बघायला मिळालं, चंद्रमुखीच्या रूपातील माधुरीच्या आपल्या अदांनी रसिकांना घायाळ करण्याचं काम केलं. शास्त्रीय नृत्यात पारंगत असलेल्या माधुरीचा मादक अवतार आजही प्रत्येक बॉलिवूड फॅनच्या लक्षात आहे.

इंडस्ट्रीत पुन्हा पदार्पण

माधुरीने 1999 मध्ये अचानक अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह करून  आपला संसार अमेरिकेतच थाटण्याचे ठरवल्याने चाहते दुःखी झाले होते

 

View this post on Instagram

 

Life is not measured by the number of breaths you take but by the moments that take your breath away🥰♥

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

मात्र काहीच वर्षात तिने 'आजा नचले' या नृत्य आधारित सिनेमातून इंडस्ट्रीत पुन्हा पदार्पण करून सर्वांना सुखद आश्चर्य दिले. पुन्हा माधुरीची जादू बॉक्स ऑफिसवर चालू लागली, देढ इश्किया, गुलाब गॅंग, टोटल धमाल या हिंदी सिनेमातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ये जवानी है दिवानीच्या घागरा गाण्यात दिसलेली रणबीर माधुरीची केमिस्ट्री सिनेमाला चार चांद लावून गेली. 2018 मध्ये माधुरी पहिल्यांदाच बकेट लिस्ट या मराठी चित्रपटातून देखील झळकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

स्वर्गीय सौंदर्य आणि निखळ हास्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीने सामाजिक कार्यात देखील नियमित हातभार लावला आहे त्याशिवाय अलीकडे तिने ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून नृत्य प्रशिक्षण द्यायला सुरवात केलीय.