Lok Sabha Election Results 2019: निवडणूक निकालाचा प्राथमिक कल समोर येताच रितेश देशमुख याने दिल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,खिलाडी वृत्तीचं केलं जातंय कौतुक
Ritesh Deshmukh Wishes Narendra Modi For HUge Verdict OF BJP (Photo Credits: Instagram)

लोकसभा निवडणुकीचे निकाल (loksabha Election Results 2019) लागण्यास आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली असून प्राथमिक कल हाती येत आहेत यानुसार देशभरात भारतीय जनता पक्षाने कमालीची आघाडी घेत 2014 चा भाजपाचाच रेकॉर्ड मोडण्याची कामगिरी केलीये आहे. या आघाडीने आनंदी झालेल्या कार्यकर्तांनी महाराष्ट उत्तर प्रदेश सह पश्चिम बंगाल मध्ये देखील आनंद साजरा करायला सुरवात केली आहे. हेच औचित्य साधत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)  याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचे अभिनंदन केले आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे समर्थन करणाऱ्या पवित्रा स्वीकारणाऱ्या रितेश ने ट्विट करून केलेले हे अभिनंदन हे त्याच्या  खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवून देणारे आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

एप्रिल महिन्यात नाशिक येथील प्रचारसभेत बोलत असताना रितेश देशमुख याने मोदींच्या छप्पन इंच छाती या वाक्यावर खोचक टिप्पणी केली होती. आपले पंतप्रधान 56 इंच छाती मिरवत आहेत पण 56 इंचाचे तर गोदरेज चे कपाट देखील असते अशा आशयाचे टीकास्त्र राहुल याने मोदींवर सोडले होते मात्र आता निवडणूक निकालातील प्राथमिक कल उघड झाल्यावर नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या आघाडीसाठी खूप शुभेच्छा असे म्हणत भारतीयांनी लोकशाही साजरी केली आहे असे रितेश देशमुख ने म्हंटले आहे.

रितेश देशमुख ट्विट

दरम्यान देशभरातील मतदारसंघात मतमोजणी सुरु असून काहीच वेळात संपूर्ण निकाल हाती यायला सुरुवाट होईल पण सद्य परिस्थिती पाहता भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व कायम आहे असेच समोर येत आहे. भाजपाच्या पक्ष कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आतापासूनच सेलिब्रेशनची तयारी सुरु केलेली दिसून येतेय.