Lata Mangeshkar (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सध्या कोरोना (Coronavirus) विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी (Maharashtra Chief Minister's Relief Fund) निर्माण केला आहे. याचपार्श्वभूमीवर कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना समर्थपणे करत आहे. कोविड19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/index ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम जमा करण्याबाबत माहिती उपलब्ध होईल. हे देखील वाचा- Shehnaaz Gill ने क्यूट अंदाजात गायलं जस्टिन बीबरचं गाणं; म्हणाली, लोक म्हणतात मला इंग्रजी येत नाही, पहा व्हिडिओ

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

महाराष्ट्रात काल 62 हजार 919 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 69 हजार 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 3 लाख 68 हजार 976 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 62 हजार 640 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.06% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.