Shehnaaz Gill (PC - Instagram)

बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ला वेगळी ओळख मिळाली आहे. शहनाज आधीपासूनचं पंजाबी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होती. पण 'बिग बॉस' चा भाग बनल्यानंतरचं तिला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. शोनंतर शहनाज बर्‍याचं दिवसानंतर चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात तिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्याचवेळी, शो संपल्यानंतर बॅक-टू-बॅक शहनाजचे अनेक संगीत व्हिडिओ रिलीझ झाले. त्याला चाहत्यांचे खूप चांगले प्रेम मिळाले. अभिनयाशिवाय शहनाज सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. शहनाजचे नव-नवीन छायाचित्रे आणि व्हिडिओची नेहमीचं चर्चा होते.

दरम्यान, सध्या शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये ती इंग्रजी बोलताना दिसत आहे. तिने या व्हिडिओत जस्टीन बीबर (Justin Bieber) यांचे गाणं गायलं आहे. क्यूट अंदाजात गायलेलं हे गाणं शहनाजच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. (वाचा - Aamir Khan च्या '3 इडियट्स' चित्रपटात Kareena Kapoor ने केलेल्या भूमिकेसाठी Anushka Sharma ने दिली होती ऑडिशन; वाढदिवसानिमित्त पहा अभिनेत्रीचा Unseen Video)

शहनाज गिल कौरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज जस्टीन बीबरचे गाणे गात असताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, शहनाज म्हणते, 'कोण म्हणते मला इंग्रजी येत नाही, पंजाबी टच असला तरी, इंग्रजी इंग्रजी आहे, मग ती कोणत्याही भाषेतून बोला. म्हणून ऐका.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

यानंतर, शहनाज गिल हॉलिवूड गायक जस्टिन बीबर यांचे गाणे पीचेस गायला सुरूवात करते. त्याचवेळी, गमतीची गोष्ट म्हणजे शहनाज थोडं गाण गायल्यानंतर गाण्याचे लिरिक्स विसरते. यावेळी ती म्हणते, 'पुढचं मी विसले.' अभिनेत्रीच्या या व्हिडिओला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली आहे. चाहते या व्हिडिओला लाईक तसेच कमेन्ट्स करत आहेत.