Gandii Baat 2 : फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन यांचा लेस्बियन सेक्स सीन झाला लीक, पहा व्हिडीओ
फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन (Photo Credit : File photo )

सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. रटाळ सास बहुच्या कचाट्यातून सुटून काही नवीन पाहायला मिळत असल्याने, प्रेक्षकही वेबसिरीजना प्राधान्य देताना दिसून येत आहेत. लव्ह, सेक्स आणि धोका यांसोबतच गे आणि लेस्बियन नात्यांवरील अनेक वेबसिरीजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना यात एकता कपूर (Ekta Kapoor) कशी मागे राहील? एकीकडे डेली सोपच्या माध्यमातून तिने छोटा पडदा काबीज केला, तर दुसरीकडे वेबसिरीजच्या माध्यमातून तिने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. अल्ट बालाजी (ALT Balaji)ची सिरीज गंदी बात (Gandii Baat)ने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या होत्या. आता याच गंदी बातचा दुसरा सिजन प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी या सिरीजमधील एक व्हिडीओ लीक झाला आहे, तो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.

या व्हिडीओमध्ये फ्लोरा सैनी (Flora Saini) आणि अन्वेशी जैन (Anveshi Jain) या दोघींमध्ये एक जबरदस्त लेस्बियन सीन चित्रित करण्यात आला आहे. फ्लोरा सैनी ही घरातील एक नोकर आहे, जिचे अफेअर घराच्या मालकिणीसोबत चालू आहे. फ्लोरा सैनीने याआधी ‘XXX’ वेबसिरीजमध्ये मध्येही काम केले आहे. या व्हिडीओमध्ये दोघी जबरदस्त किस करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून गंदी बातच्या दुसऱ्या सिजनमध्येही काही मसालेदार पाहायला मिळेत यात शंका नाही.

गंदी बातच्या पहिल्या सिजनमध्ये अनंत जोशी (Anant Joshi), नीता शेट्टी (Neetha Shetty), नारायणी शास्त्री (Narayani Shastri), राजेश त्रिपाठी (Rajesh Tripathi), मृणाली त्यागी (Mrinali Tyagi), रोहित चौधरी (Rohit Choudhary), दीपिका खन्ना (Deepika Khanna), नवीन पंडित (Naveen Pandita), रिपराज चौहान (Ripraj Chauhan), वैभव शाह (Vaibhav Shah), निर्बान गोस्वामी (Nirban Goswami), कल्याणी चैतन्य (Kalyani Chaitanya) आणि यामिनी सिंह (Yamini Singh) यांसारखे मोठे कलाकार होते.

गंदी बात ही एक अशी वेबसिरीज आहे ज्यामध्ये ‘सेक्स’ हा मध्यवर्ती विषय ठेऊन कहाण्या विणलेल्या आहेत. आतापर्यंत फक्त मासिकात वाचलेल्या किंवा ज्यांच्याबद्दल कधी मोकळेपणाने बोलले जात नाही अश्या कहाण्या पहिल्या सिजनमध्ये पाहायला मिळाल्या होत्या, आता दुसरा सिजन काय हंगामा करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.