Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेऊन घरी परतल्यानंतर सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. लता मंगेशकर गेल्या 28 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. लता मंगेशकर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कुटुंबियांसह त्यांचे चाहते मनापासून प्राथना करत होते. यांच्या प्राथनेमुळेच त्या रुग्णालयातून सुखरूप घरी परतल्या आहेत, असे मत लता मंगेशकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत.

लता मंगेशकर यांची 11 नोव्हेंबर रोजी अचानक प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रुग्णालयातून घरी परतल्यानंतर लता मंगेशकर यांनी कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांचेही आभान मानले आहेत. "नमस्कार मी गेल्या 28 दिवसांपासून ब्रीच कॅंडी रुग्णालयात होते. मला न्यूमोनिया झाला होता. मला पूर्णपणे बरे व्हावे आणि मी घरी परत जावे, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी परतले आहे. ईश्वर आणि आईवडिलांच्या आशिर्वादासह आपण सर्वांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या प्राथनेने मी आता बरी आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानत आहे", असे लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- पती रणवीर सिंह सोबत काम करण्यास दीपिका पादुकोण ने दिला नकार; रिअल लाईफ नातं ठरलं रिल लाईफच्या ब्रेकअपचे कारण

लता मंगेशकर यांचे ट्वीट-

 

दरम्यान, लता मंगेशकर रुग्णालयात असताना राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लता दीदींची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतरही राज ठाकरे फोन वरून तसेच प्रत्येक्ष भेटून लता दीदींच्या तब्येतीचा आढावा घेत होते. चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनीही काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात गायिका लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. तसेच लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.