Kunal Kamra (Photo Credit X)

Kunal Kamra Controversy: प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) च्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध विनोदी कलाकाराने वादग्रस्त विधान केल्यापासून सर्वत्र वातावरण तापलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर कुणाल कामरा विरोधात खटला सुरू आहे. तथापि, आता कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातचं आता विनोदी कलाकाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कामराच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकत असल्याने त्याला अटकपूर्व जामीन हवा आहे.

कुणाल कामराने मागितला ट्रान्झिट अॅसिप्टरी जामीन -

कुणाल कामराने त्यांच्या शोमध्ये एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर, मुंबईच्या खार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आता, त्याच्याविरुद्धच्या त्याच एफआयआरच्या संदर्भात, विनोदी कलाकाराने मद्रास उच्च न्यायालयात ट्रान्झिट अॅन्स्टिपेट्री जामिनासाठी अर्ज केला आहे. या वादाच्या सुरू असलेल्या चौकशीत कुणाल कामराने अटकेपासून संरक्षण मागितले आहे. (हेही वाचा -( Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'गद्दर' वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी बजावले समन्स)

दरम्यान, कुणाल कामराचे वकील व्ही. सुरेश यांनी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्यासमोर तातडीने सुनावणीसाठी याचिकेचा उल्लेख केला. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ई-फायलिंग सिस्टमद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कुणाल कामरा यांनी असा युक्तिवाद केला आहे की, त्यांच्याविरुद्ध आरोप असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो निर्दोष आहे आणि त्यांना या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे. (हेही वाचा, Kunal Kamra Eknath Shinde Controversy: कुणाल कामरा याने कोणाचाही अपमान करू नये: रामदास आठवले)

कुणाल कामराने ठोठावला मद्रास उच्च न्यायालयाचा दरवाजा -

आता कुणाल कामराला त्याच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणी येत आहेत. मद्रास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर विनोदी कलाकाराला दिलासा मिळतो की नाही? याकडे सर्वांना लक्ष लागले आहे. सध्या कुणाल कामरा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. जर त्याला ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामीन मिळाला नाही तर विनोदी कलाकाराला तुरुंगातही जावे लागू शकते.