Ramdas Athawale | (Photo Credits: X/ANI)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्टँड-अप कॉमेडियन (Stand-Up Comedy) कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, जर कामरा यास कोणालाही 'गद्दार' म्हणायचे असेल तर त्यांनी प्रथम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा शब्द वापरावा, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) विश्वासघात केला. आठवले यांनी कामरास राजकीय मुद्द्यांपासून दूर राहण्याचा आणि केवळ कलाकार म्हणून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. शिवाय त्याने कोणाचाही अपमान करु नये, असेही आठवले म्हणाले.

'कलाकारांनी अशा प्रकरणांमध्ये अडकू नये'

कुणाल कामरा जर कलाकार असतील तर त्यांनी कोणावरही टीका करण्यासाठी गाणी गाऊ नयेत. त्यांनी अशा प्रकरणांमध्ये अडकू नये. अशी भाषा वापरणे योग्य नाही. जर त्यांना एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणायचे असेल तर त्यांनी प्रथम उद्धव ठाकरेंना देशद्रोही म्हणावे कारण त्यांनी भाजपशी विश्वासघात केला आहे. जर त्यांना एक चांगला कलाकार व्हायचे असेल तर त्यांनी अशी विधाने करू नयेत, असे आठवले यांनी सोमवारी एएनआयशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'गद्दर' वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी बजावले समन्स)

कुणाल कामरावर एफआयआर दाखल

कुणाल कामरा यांने त्यांच्या ताज्या यूट्यूब व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. सोमवारी शिवसेना समर्थकांनी मुंबईतील द हॅबिटॅट कंट्री क्लबमध्ये तोडफोड केल्याने या वादाला हिंसक वळण लागले, जिथे कामरा यांचा कार्यक्रम चित्रित झाला.

कुणाल कामरा भाडोत्री कलाकार- नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरा म्हणजे भाड्याने घेतलेला विनोदी कलाकार असल्याचा आरोप केला. जो पैशाच्या बदल्यात अशा प्रकारच्या वक्तव्ये करत होता. म्हस्के यांनी संजय राऊत आणि शिवसेना (यूबीटी) गटावरही टीका केली आणि असे सुचवले की त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे त्यांना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी कामरासारख्या लोकांवर अवलंबून राहावे लागले.

कुणाल कामरा हा भाड्याने घेतलेला विनोदी कलाकार आहे आणि तो काही पैशांसाठी आमच्या नेत्यावर भाष्य करत आहे. महाराष्ट्र तर सोडाच, कुणाल कामरा भारतात कुठेही मुक्तपणे जाऊ शकत नाही; शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवून देतील. आम्हाला संजय राऊत आणि शिवसेना (यूबीटी) बद्दल वाईट वाटते कारण त्यांच्याकडे आमच्या नेत्यावर भाष्य करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते शिल्लक नाहीत, म्हणूनच ते त्यांच्यासारख्या लोकांना या कामासाठी कामावर ठेवत आहेत, असे म्हस्के यांनी रविवारी एएनआयशी बोलताना सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावरील कुणाल कामरा यांच्या वक्तव्याभोवतीचा वाद वाढतच चालला आहे, शिवसेना आणि भाजपमधील राजकीय नेते विनोदी कलाकाराचा निषेध करत आहेत. शिवसेना (यूबीटी) सदस्यांनी कामरा यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण केले आहे, तर महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.