सना सईद
कुछ कुछ होता है... शाहरुख खान, काजोल आणि करण जोहर या तिघांच्याही कारकीर्दीमधील एक महत्वाचा चित्रपट. या चित्रपटाने या तिघांनाही यशाच्या शिखरावर पोहचवले. काल या चित्रपटाने तब्बल 20 वर्षे पूर्ण केली. 20 वर्षे हा चित्रपट प्रेक्षकांच्या दिलावर अधिराज्य गाजवत असून आज तसूभरही या चित्रपटाची जादू कमी झाली नाही. आजही या चित्रपटामधील शॉट्स, सिन्स, संवाद, गाणी, कॉस्चुम्स कित्येकांच्या डोळ्यासमोर तरळत असतील. या चित्रपटामधील अजून एक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली ती म्हणजे छोटी अंजली.
शाहरुख-काजोल, राणी मुखर्जीसह ही छोटी अंजली म्हणजे सना सईद प्रेक्षकांना प्रचंड भावली. तिचे मनाला भिडणारे संवाद, तिचा हट्ट, कमी वयातील समजूतदारपणा अशा अनेक गोष्टींमुळे छोटी अंजली देखील तितकेच लोकप्रिय ठरली होती. आता हीच सना एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत आहे.
सनाचा जन्म 22 डिसेंबर 1988 साली मुंबई येथे झाला. 'कुछ-कुछ होता है' वेळी सनाचे वय अवघे दहा वर्षे होते, मात्र आता 20 वर्षांनतर या चिमुकलीचे रुपांतर एका सुंदर तरुणीमध्ये झाले आहे.
या फोटोमध्ये छोटी अंजली आणि आताची सना यांमधील फरक दिसून येतो.
कुछ कुछ होता है चित्रपटानंतर सना बादल, हर दिल जो प्यार करेगा, स्टुडंंट ऑफ द इयर अशा चित्रपटांमध्ये झळकली. तर छोट्या पडद्यावर बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गयी पूजा इस घर की, झलक दिखला जा 6-7-9, एमटीव्ही स्प्लिट्सविला अशा शोजमधून तिची झलक पाहायला मिळाली.
सना सोशल मिडीयावर खूपच सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळ जवळ 4 लाख फॉलोअर्स आहेत.