Khuda Haafiz Chapter II : खुदा हाफिज चॅप्टर 2 चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात, विद्युत जामवालने केली सोशल मीडियावर घोषणा
Vidyut Jammwal (Photo Cedits: YouTube)

विद्युत जामवाल (Vidyut Jammwal ) आणि शिवालीका ओबेरॉय (Shivaleeka oberoi) यांनी खुदा हाफिज चॅप्टर 2 (Khuda Haafiz Chapter II) चित्रपटाला नुकतीच सुरूवात केली आहे. अग्नी परीक्षेच्या (Agni Pariksha) शूटिंगला सुरुवात केल्याचे त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले. २०२० मध्ये डिस्नी + हॉटस्टारवर प्रीमियर झालेल्या खुदा हाफिज या चित्रपटाचा हा सिक्वल (sequel) आहे. विद्युतने सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे. स्वत: ची आणि त्याच्या चित्रपटातील हिरोईनची चित्रपटाच्या निर्मात्यांसमवेत असलेला एक फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे. खुदा हाफिज चॅप्टर 2 अग्नी परीक्षेच्या टीमने शूटिंग सुरू केल्याची घोषणा करत विद्युत जामवाल यांनी एक ग्रुप फोटो शेअर केला. फोटोमध्ये विद्युत, शिलीका ओबेरॉय, दिग्दर्शक फारूक कबीर आणि निर्माते, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक आहेत.

कमांडो विद्युत जामवालनेन लिहिले की, कथा ही इंटेंसची पुन्हा व्याख्या करण्यासाठी होती. हा पॅनोरामा स्टुडिओ निर्मीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शुटींग प्रथम मुंबई शहरात होणार असून त्यानंतर लखनौमध्ये करण्यात येणार आहे. सिक्वेलमध्ये जामवाल आणि ओबेरॉय यांच्यातील प्रेमकथा दर्शविली गेली आहे. नाटक आणि कृती नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. खुदा हाफिज चॅप्टर 2 म्हणजेच अग्नी परीक्षा चित्रपटही तेवढाच पसंतीस पडेल. विद्युत त्याच्या होम प्रॉडक्शन निर्मित आयबी 71 हा चित्रपटालाही सुरुवात करणार आहे.

या चित्रपटावरील काम जूनमध्ये सुरू झाले होते. शिवालीका ओबेरॉय या चित्रपटात मुख्य स्त्री व्यक्तीरेखेच्या भुमिकेत दिसणार आहे. तिने ही सेटवरील फोटो शेअर करत आपली मतं मांडलं आहे. खुदा हाफिजबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी डिस्ने + होटस्टारवर हा डिजिटल रिलीज झाला होता. उझबेकिस्तानमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात अन्नू कपूर, आहाना कुमरा, शिव पंडित, विपिन शर्मा आणि नवाब शाह यांनीही काम केले आहे. रोमँटिक अ‍ॅक्शन अभिनेता समीर चौधरी (विद्युत) आणि त्याची पत्नी नर्गिस (शिवालीका) यांना वाचवण्याच्या मिशनच्या भोवती फिरत होता. ती मध्यपूर्वेत आल्यानंतर देह व्यापारात अडकली होती. अग्नी परीक्षाशिवाय विद्युत जामवाल संकल्प रेड्डीच्या आयबी 71 मध्ये दिसणार आहेत. हा अभिनेता त्याच्या होम बॅनर, अ‍ॅक्शन हीरो फिल्म्स या चित्रपटाद्वारे निर्मिती करत आहे.