KGF 2 रिलीज होण्याआधीच UK मध्ये 12 तासांच्या आत 5000 तिकिटे विकल्या गेल्याचा दावा
KGF 2 (Photo Credit - Twitter)

रॉकिंग स्टार यशचा आगामी चित्रपट KGF Chapter 2 रिलीज होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असून सोशल मीडियावर वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून रिलीजपूर्वीच KGF Chapter 2 ने विक्रम केला आहे. हा रेकॉर्ड अॅडव्हान्स बुकिंगशी संबंधित आहे. KGF Chapter 2 च्या स्टारकास्टमध्ये कन्नड स्टार यश तसेच संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि मालविका अविनाश यांचा समावेश आहे. खरेतर, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी एका आंतरराष्ट्रीय वितरकाचे एक ट्विट रिट्विट केले आहे, ज्यामध्ये KGF 2 ची आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून 12 तासांच्या आत 5000 तिकिटे विकल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा विक्रम आहे. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते चित्रपटासाठी आणखी उत्सुक झाले आहेत आणि त्यांना आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करेल.

Tweet

कोणी किती घेतले मानधन

दुसरीकडे, जर आपण KGF चॅप्टर 2 स्टार्सच्या मानधनाद्दल बोललो, तर सेलिब्रिटींना खूप मोठे मानधन मिळाले आहे. KoiMoi च्या अहवालानुसार, यशने KGF Chapter 2 साठी एकूण 25 कोटी रुपये मानधन आकारले आहे. दुसरीकडे, संजय दत्तने अधीराच्या भूमिकेसाठी 9 कोटी रुपये घेतले आहेत. यासोबतच या चित्रपटासाठी श्रीनिधीने 3 कोटी रुपये आणि रवीना टंडनने 1.5 कोटी रुपये घेतले आहेत. (हे देखील वाचा: Beast Trailer: थलपथी विजयचा Beast चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, विजय रॉ एजंटच्या भूमिकेत)

चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित 

विशेष म्हणजे, KGF 2 हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. होमबेल फिल्म्सच्या बॅनरखाली प्रशांत नील लिखित आणि दिग्दर्शित आणि विजय किरगांडूर निर्मित पीरियड अॅक्शन फिल्म 14 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे.