
Kareena Kapoor and Shahid Kapoor: जयपूरमध्ये इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) 2025 सुरू झाला आहे. जिथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. दरम्यान, आयफा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात करीना कपूर खान(Kareena Kapoor), शाहिद कपूर (Shahid Kapoor) एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. एवढेच नाही तर करीना थांबून शाहिदशी बोलली. दोघांनी एकत्र उभे राहून पोजही दिल्या. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंटही करत आहेत.Jatadhara First Look: जटाधारा चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूकआला समोर, येथे पाहा पोस्टर
या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यात एकाने, 'गीता आणि आदित्य' असे प्रतिक्रिया देत लिहिले. तर, दुसऱ्याने 'ओएमजी, शाहिद आणि करीना माझे आवडते आहेत' असे प्रतिक्रिया देत लिहिले. तिसऱ्याने'जब वी मेट २' असे प्रतिक्रिया देत लिहिले. याशिवाय, इतर अनेक वापरकर्त्यांनी दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.
शाहिदकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल
गेल्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारांमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये करीना कपूर शाहिद कपूरला दुर्लक्ष करून रेड कार्पेटवर पुढे चालत गेल्याचे दिसले होते.
View this post on Instagram
'फिदा'च्या सेटवर शाहिद आणि करीनाची पहिली भेट
2004 मध्ये 'फिदा' चित्रपटाच्या सेटवर करिना आणि शाहिद एकमेकांना पहिल्यांदा भेटले. दोघांनीही 2007 पर्यंत एकमेकांना डेट केले. त्यानंतर 'जब वी मेट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही वेगळे झाले. दोघांनी 2016 मध्ये 'उडता पंजाब' चित्रपटातही एकत्र काम केले होते. पण त्यात त्यांचा एकही सीन एकत्र नव्हता.