Kapil Sharma-Ginni Chatrath 3rd Reception Party: कपिल शर्माच्या 3rd रिसेप्शन पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार?
Kapil Sharma-Ginni Chatrath (Photo Credits-Instagram)

Kapil Sharma-Ginni Chatrath 3rd Reception Party: कपिल शर्मा (Kapil Sharma) गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) यांचा विवाहसोहळा 12 आणि 13 डिसेंबरला जालंधरमध्ये पार पडला. नैराश्यावर मात करून कपिल शर्माने टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. त्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही कपिलने नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. तसेच J.W. Marriot येथे ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनच्या वेळी टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड, पंजाबी इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

तर सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, कपिल शर्मा आपल्या लग्नाच्या तिसऱ्या रिसेप्शनची पार्टी देणार असल्याचे सांगितले जात आहे. तर शनिवारी (2 फेब्रुवारी) दिल्ली येथे हे रिसेप्शन ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्याचसोबत कपिल- गिन्नी या दोघांचे जवळीक मित्रमंडळी उपस्थित राहणार आहे.(हेही वाचा-Kapil Sharma-Ginni Chatrath Reception Party: कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीमध्ये DeepVeer चा 'आंख मारे' डान्स (Video))

 

View this post on Instagram

 

ਅਨੰਦ ਕਾਰਜ 😊🙏 @ginnichatrath @kaleereinbykanikakumria @punitarora.in @deepikasdeepclicks

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कपिल आणि गिन्नी यांच्या रिसेप्शन पार्टी मध्ये सोहेल खान, सलीम खान, रेखा, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तर आताच्या तिसऱ्या रिसेप्शनला राजकीय पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.