Kapil Sharma -Ginni Chatrath Reception Party: कपिल शर्मा (Kapil Sharma) गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) यांचा विवाहसोहळा 12 आणि 13 डिसेंबरला जालंधरमध्ये पार पडला. नैराश्यावर मात करून कपिल शर्माने टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. त्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही कपिलने नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. गिन्नी आणि कपिल अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पंजाबमध्ये विवाहसोहळा पार पडल्यानंतर बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील कलाकारांसाठी कपिलने खास मुंबईत एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होत.
कपिल आणि गिन्नी यांच्या रिसेप्शन पार्टी मध्ये सोहेल खान, सलीम खान, रेखा, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सोबतच हिंदी टेलिव्हिजनवरील कलाकारांनी देखील गिन्नी आणि कपिलला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील रिसेप्शन पार्टी मध्ये गायक मिका सिंग सोबत रणवीर सिंग देखील गाताना आणि थिरकताना दिसला आहे. सध्या सिम्बा या रणवीरच्या आगामी सिनेमामधील प्रचंड लोकप्रिय होत असलेल्या ' आंख मारे' या गाण्यावर थिरकताना दिसला.
View this post on Instagram
कपिल शर्मा रिसेप्शन पार्टीमध्ये ब्लॅक सूट मध्ये आला होता तर गिन्नी पांढऱ्या रंगाच्या भरजरी लेहंगामध्ये सहभागी झाली होती. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही रिसेप्शन पार्टी रात्री उशिरापर्यंत रंगली होती.