अभिनेता ईशान खट्टर पडला 24 वर्षाने मोठ्या असलेल्या तब्बूच्या प्रेमात; दोघांची प्रमुख भूमिका असलेली 'अ सूटेबल बॉय' वेबसिरीज लवकरच होणार प्रदर्शित
A Suitable Boy (Photo Credits: Instagram)

'धडक' फेम चॉकलेट बाय ईशान खट्टर( Ishaan Khattar) लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आपल्या भेटीला येत आहे. मात्र हा प्रोजेक्ट कोणत्या चित्रपटाचा नसून त्याच्या नवीन वेबसीरिजचा आहे. 'अ सूटेबल बॉय' (A Suitable Boy) असे या वेबसिरीजचे नाव असून यात प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू (Tabu) त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. धडक चित्रपटानंतर ईशान खट्टर कोणत्याही नवीन चित्रपटात दिसला नाही. त्यामुळे त्याच्या या वेबसिरीजचे त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ईशानला धडक या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला होता. नुकताच त्याच्या या नवीन वेबसिरीजचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

या पोस्टरमध्ये ईशान त्याच्यापेक्षा वयाने २४ वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बू आहे.

'A Suitable Boy' चा फर्स्ट लूक:

 

View this post on Instagram

 

First look #ASuitableBoy @bbcone #MiraNair

A post shared by Tabu (@tabutiful) on

हेदेखील वाचा- De De Pyaar De Song Chale Aana: 'दे दे प्यार दे' सिनेमातील अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग यांचा इमोशनल ट्रॅक 'चले आना' आऊट! (Video)

‘अ सूटेबल बॉय’मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या रुपात झळकणार आहे. तब्बूनेच सोशल मीडियावर या आगामी वेब सिरीजचे पोस्टर शेअर केले.

या वेब सीरिजमध्ये ईशान कॉलेजमधील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारणार आहे. तर तब्बू देहविक्री करणारी महिला सादर करत आहे. श्रीमंत घरातील मुलगा वेश्या व्यवसाय करणाऱ्या माहिलेच्या प्रेमात पडल्यावर काय घडते? हे ‘अ सूटेबल बॉय’मध्ये दाखवले जाणार आहे. जून 2020 मध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.