इंडियन आयडॉलचा सुत्रसंचालक आदित्य नारायणसह पत्नी श्वेता यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह
Aditya Narayan (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आणि इंडियन आयडॉलचा सुत्रसंचालक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता हिला कोरोनाची लागण झाली आहे. आादित्यने सोशल मीडियात एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. आदित्यने आपली पत्नी श्वेता सोबतचा एक फोटो शेअर करत ते दोघे एका लिफ्टमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. फोटोला कॅप्शन देत आदित्य याने असे लिहिले की, हॅलो मित्रांनो माझी आणि माझी पत्नी श्वेता अग्रवाल हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आम्ही क्वारंटाइन झाले आहोत.

आदित्य नारायण याने पुढे असे लिहिले की, सर्वांनी सुरक्षित रहा. नियमांचे पालन करणे विसरु नका आणि आम्हाला आशीर्वादात लक्षात ठेवा. ही वेळ सुद्धा निघून जाईल. तर आदित्य नारायण हा लोकप्रिय रियॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतो. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान त्याचे विविध लोकांसोबत बोलणे भेटणे होते. अशातच आता शो मधील क्रू मेंबर्सची सुद्धा कोरोनाची चाचणी केली जाणार का हे पहावे लागणार आहे.(Tariq Shah Passes Away: बॉलिवूडमधून वाईट बातमी आली समोर; अभिनेते, दिग्दर्शक तारिक शाह यांचे आज निधन)

दरम्यान, नुकत्याच टीव्ही अभिनेता राम कपूर याने कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्याचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोला त्याने कॅप्शन देत असे म्हटले होते की, लसीकरण झाले आहे. टीव्ही अभिनेता मिश्कत वर्मा याची सुद्धा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने ही सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले की, माझी काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. सध्या मी ठीक असून तुम्ही सुद्धा काळजी घ्या.