Tariq Shah Passes Away: बॉलिवूडमधून वाईट बातमी आली समोर; अभिनेते, दिग्दर्शक तारिक शाह यांचे आज निधन
Tariq Shah (Photo Credit: PWC, Instagram)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेते, दिग्दर्शक तारिक शाह (Tariq Shah) यांचे आज (3 एप्रिल) रोजी निधन झाले आहे. मुंबईमधील (Mumbai) एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तारिक शाह गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते. तसेच ते काही काळापासून डायलिसिसवरही होते. तारिकच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकांची लाट उसळली आहे. तारिक शाह हे अभिनेत्री शोमा आनंद हिचे पती होते. त्यांना ‘कडवा सच’ या मालिका आणि ‘जनम कुंडली’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. हे देखील वाचा- लेखक-फिल्ममेकर Apurva Asrani आणि पार्टनर Siddhant Pillai यांचे 14 वर्षांनी ब्रेकअप; LGBTQ समुदायासाठी होते रोल मॉडेल

इंस्टाग्राम पोस्ट-

तारिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘यादोंकी बारात’, ‘जखमी’, ‘गुमनाम है कोई’, ‘मुंबई सेंट्रल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘जन्म कुंडली’, ‘बहार आने तक’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.