तारुण्य टिकवण्यासाठी सेलेब्ज करतात या विचित्र उपचारांचा वापर

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या सेलेब्रिटीचा दिवाना असतो. मात्र तारकांचे सौंदर्य आणि त्यांचे वाढलेले वय याची सांगड काही सामान्य मनुष्य घालू शकत नाही. सेलेब्ज नेहमीच वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करीत असतात. ते पाहून आपण असा अंदाज लावत असतो की सेलिब्रिटी देखील हीच उत्पादने वापरत असावेत, पण असे नाही. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सेलेब्रिटी नेहमीच वेदनादायक आणि त्रासदायक उपचार अथवा थेरेपींचा वापर करत असलेले दिसत आहेत. चला पाहूया अशा कोणत्या सेलेब्रिटी आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या विचित्र पद्धतींचा वापर केला आहे.

ग्वेनेथ पॅल्ट्रो

45 वर्षीय ही अमेरिकन अभिनेत्री जगभरातील लाखो लोकांच्या दिलाची धडकन आहे. स्वतःचे सौंदर्य लुप्त होऊ नये म्हणून ही अभिनेत्री सापाच्या विषापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करते. यामुळे तिला प्रचंड वेदनांचा सामनाही करावा लागतो.

डेमी मूर

अमेरिकन अभिनेत्री डेमी मूर वयाच्या 55 वर्षीही अतिशय सुंदर दिसते. पण नुकतेच तिच्या सौंदर्याचे गुपित उघड झाले. डेमी आपले सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी जळवांचा वापर करते. या उपचार पद्धतीमध्ये जळू शरीरातील अनेक विषारी घटक शोषून घेऊन ते बाहेर सोडण्याचे कार्य करतात.

स्कार्लेट जोहानसन

स्कार्लेट ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. निष्कर्षादरम्यात जगभरात तिचे लाखो चाहते असलेले आढळून आले. एका मुलाखतीदरम्यान स्कार्लेटने त्वचेचे तेज टिकून राहावे यासाठी ती सफरचंदाच्या रसाचा वापर करीत असल्याचे सांगितले.

व्हिक्टोरिया बेकहॅम

मॉडेल आणि फॅशन डिझायनर, व्हिक्टोरिया बेकहॅम ही त्वचेचे सौंदर्य टिकून राहावे यासाठी ज्या गोष्टीचा वापर करते ते ऐकून आपल्या खूप जणांना किळसवाणे वाटू शकते. तर ही अभिनेत्री आपल्या चेहऱ्यावरील चमक टिकवून ठेवण्यासाठी पक्षांच्या विष्ठेचा वापर करते.

किम कर्दाशियन

अत्यंत बोल्ड असलेली ही अभिनेत्री तिच्या तीक्ष्ण आणि सौंदर्यात्मक गुणांसाठीही प्रसिद्ध आहे. किम आपल्या त्वचेसाठी ‘प्लेटलेट-रिच प्लाझमा थेरपी’चा वापर करते. या थेरपीमध्ये शरीरातून रक्त बाहेर काढले जाते आणि प्लेटलेट-रिच प्रोटीन्सची प्रक्रिया करून हे रक्त परत शरीरामध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने सोडले जाते.

उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला बॉलीवुडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये तिच्या फॉलोवर्स संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र स्वतःच्या सौंदर्यासाठी उर्वशीला अतिशय वेदनामय उपचारांचा आधार घ्यावा लागला आहे. यासाठी तिने कपिंग थेरेपीचा वापर केला. यामध्ये व्हॅक्यूम तयार करण्यासाठी काचेचे छोटे कप गरम केले जातात. त्यानंतर ते पाठिवर ठेवून खेचले जातात. त्यामुळे शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या पाठीवर लाइट ब्राउन कलरचे दाग दिसून आले होते. तर दिशाच्या पाठिवरचे डाग हे तिने केलेल्या कपिंग थेरपीचेच होते.

जेनिफर लोपेझ

जेनिफर लोपेझ ही अशी अभिनेत्री आहे जी स्वतःच्या सौंदर्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आपल्या चेहऱ्याची चमक टिकून राहावी यासाठी ही अभिनेत्री मानवी गर्भवेष्टनाच्या फेशियलचा वापर करते.

केटी होम्स

केटी होम्सदेखील आपल्या सौंदर्यासाठी मानवी गर्भवेष्टनापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करते.