Michael Jackson 10th Death Anniversary: किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन आजही आहे जिवंत; त्याच्या नावावर होते कोट्यवधी रुपयांची कमाई
Michael Jacksson 10th Death Anniversary. (Photo Credits: Twitter)

Michael Jackson 10th Death Anniversary: किंग ऑफ पॉप अशी ओळख असलेला आणि जगभरातील तरुणाईच्या हृदयावर राज करणारा पॉपस्टार मायकल जॅक्सन याचे निधन होऊन आज दहा वर्षे उलटली. पण, आजही तो त्याचे चाहते आणि पॉप रसिकांच्या मनात जिवंत आहे. त्याची गाणी, नृत्य आणि स्मृती यावर त्याचे चाहते आजही फिदा असतात. इतकेच नव्हे तर मायकेल जॅक्सन याच्या नावावर आजही कोट्यवधी रुपयांची कमाइ होते असे सांगितले जाते. आज त्याची दहावी जयंती. मायकलच्या 10 व्या जयंतीनिमीत्त या काही खास गोष्टी त्याच्या चाहत्यांसाठी.

रॉक अॅण्ड रोल हॉल ऑफ फेम

मायकल जॅक्सन यांचा 25 जून 2009 रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. लॉस एंजेलिस येथी राहत्या घरी मायकल जॅक्सन याचा मृतदेह आढळून आला. मायकल जॅक्सन हा एकमेव सिंगर आहे ज्याला रॉक अॅण्ड रोल हॉल ऑफ फेम ने (Rock & Roll Hall of Fame) सन्मानित करण्यात आले. त्याला एकूण 26 अमेरिकन संगीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आजही जगभरात मायकल जॅक्सनचे चाहते आहेत. मायकलला आपल्या आयुष्यात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण, त्याच सोबत त्याला तितकी बदनामीही वाट्याला आली.

लैंगिक शोषणाचा आरोप आणि निर्दोश मुक्तता

मायकेलच्या अखेरच्या काळात कर्ज आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण या आरोपांनी मायकल याला सर्वात जास्त त्रास दिला. आपल्याच भाच्यांवर लैंगिक शोषण केल्याचा मायकलवर 2005 मध्ये आरोप करण्यात आला होता. या आरोपांचे खंडण करताना मायकलने म्हटले होते की, माझे माझ्या भाच्यांवर प्रचंड प्रेम आहे. माझ्यावरील आरोप हे बिनबुडाचे आहेत. लैंगिक शोषण प्रकरणात त्याच्यावर चार महिने खटला चालला मात्र या खटल्यात तो निर्दोश ठरला. (हेही वाचा, अबब ! मृत्युनंतरही अब्जावधींची कमाई करत आहेत ही मंडळी; मायकल जॅक्सन पहिल्या स्थानावर)

मायकेलच्या नावावर आजही कोट्यवधी रुपयांची कमाई

मायकल याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यावर प्रचंड कर्ज होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाने होणाऱ्या कमाईतूनच त्याच्या कुटुंबीयांनी कर्जाची परतफेड केली. सन 2018 मध्ये त्याच्या नावावर 28.40 अब्ज रुपयांची कमाई झाली होती. मायकलच्या मृत्यूनंतरही त्याचे जुने अल्बम विकले जातात. तसेच, इतही अनेक डील होतात. त्यातून अब्जावधी रुपयांची कमाई होते. हॅलोवीन आणि स्क्रीम अल्बमुळे प्रचंड कमाई होते. फोर्ब्सच्या यादीतही मायकल जॅक्सन गेल्या पाच वर्षात टॉपला आहे. 2018 मध्ये दूसऱ्या क्रमांकावर दिवंगत सिंगर एल्विसी प्रेस्ली राहिला होता. फोर्ब्सच्या यादीनुसार 25 जून 2009 मध्ये मृत्यूनंतर आतापर्यंत 9 वर्षात मायकल जॅक्सन याच्या नावावर 2.4 बिलियन डॉलर (भारतीय रुपयांत 17,110 कोटी रुपये ) इतकी कमाई झाली होती.