James Michael Tyler Dies at 59:  'Friends' मधील Gunther साकारणार्‍या अभिनेत्याचं कॅन्सर शी झुंजताना निधन
James Michael Tyler | PC: Twitter/ warnerbrostv

लोकप्रिय सिटकॉम 'Friends' मधील कॉफी शॉप मॅनेजर Gunther साकारणारा अभिनेता James Michael Tyler याचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. अमेरिकेत कॅन्सरशी झुंज देता देता James Michael Tyler याने लॉस एंजेलिस मधील त्याच्या राहत्या घरीच शेवटचा श्वास घेतला. अमेरिकन मीडीया रिपोर्ट्स नुसार, Tyler हा Prostate Cancer शी झगडत होता. पहिल्यांदा त्याला 2018 साली कॅन्सरचं (Cancer) निदान झालं होतं.

फ्रेंड्स ही सहा मित्रांची कहाणी होती पण त्याव्यतिरिक्त पात्र साकारणार्‍यांपैकी 'गंथर' हे देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं. 10 सीझन मध्ये अंदाजे गंथर 150 एपिसोड्स द्वारा रसिकांच्या भेटीला आला होता. 1990 साली आलेल्या या सीटकॉम मध्ये Central Perk या कॉफी शॉप मध्ये गंथर मॅनेजर होता. येथे अनेकदा सहा मित्र हॅंगआऊट करत होते. त्यापैकी Rachel या पात्रावर गंथर ला विशेष आकर्षण होतं. Friends: The Reunion Time and Date: मोठी बातमी! भारतामध्ये Zee5 वर प्रसारित होणार 'फ्रेंड्स: द रीयूनियन'; जाणून कधी व कसे पाहू शकाल.  

James Michael Tyler हा फ्रेंड्स व्यतिरिक्त 'Scrubs','Sabrina the Teenage Witch' आणि 'Modern Music'मध्ये देखील झळकला होता. Warner Bros TV कडून ट्वीट करून James Michael Tyler साठी आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे.

Warner Bros. TV ट्वीट  

Tyler ने NBC च्या 'Today' या शो मध्ये जून मध्ये बोलताना Advanced Prostate Cancer चं सप्टेंबर 2018 मध्ये निदान झाल्याचं सांगितलं होतं. नंतर तो हाडांमध्ये पसरला होता. त्याला या कॅन्सरचं निदान रूटीन फिजिकल टेस्ट दरम्यान झालं होतं.