भारतात पावसाला सुरुवात झाली असली तरीही काही भागात अद्याप पावसाचा एक थेंबसुद्धा पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे अशा भागात भीषण दुष्काळाचे संकट तेथील नागरिकांवर ओढवले असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. तर चेन्नईत (Chennai) सुरु असलेल्या भीषण पाणी टंचाईबद्दल (Water Crisis) टायटॅनिक (Titanic) मधील जॅक (Jack) नावाच्या भुमिकेत झळकलेल्या अभिनेत्याने याबद्दल आपल्या भावना सोशल मीडियात व्यक्त केल्या आहेत.
हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो द कॅप्रिओने (Leonardo DiCaprio) इन्टाग्रामवर एक पोस्टच्या माध्यमातून चैन्नईमधील पाणी टंचाईबद्दल आपल्या भावना मांडल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने असे म्हटले आहे की, चेन्नईला भीषण पाणी टंचाईतून फक्त पाऊसच वाचवू शकतो. या ठिकाणी असलेल्या विहिरीत कोरड पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टॅन्करने येथील नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी अनेक हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. तर नागरिकांना या भीषण पाणी टंचाईची चिंता सतावत असून सर्वजण आता फक्त राज्यात पाऊस कधी पडतो याकडे लक्ष लावून बसले आहेत. (Michael Jackson 10th Death Anniversary: किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन आजही आहे जिवंत; त्याच्या नावावर होते कोट्यवधी रुपयांची कमाई)
लिओनार्डो याची एक फाउंडेशन असून ती पर्यावरणाच्या जागृकतेबद्दल काम करते. तसेच संस्था पर्यावरण पूरक कामांसाठी निधीसुद्धा देते. तर सध्या लिओनार्डो त्याचा आगामी चित्रपट 'वन्स अपॉन टाइम इम हॉलिवूड' यामध्ये लवकरच झळकणार आहे.