Oscar-Winning Actress Susan Sarandon (Photo Credits: Twitter

सध्या देशात जवळजवळ 2 महिन्यांपासून तीन नव्या शेती कायद्यांच्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आज देशभर ‘चक्क जाम’ पुकारला आहे. हे आंदोलन आता इतके चिघळले आहे की याची दाखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली आहे. याआधी पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर ट्वीट केले आहे. आता यामध्ये अजून एका आंतरराष्ट्रीय सेलेब्जचे नाव जोडले गेले आहे. ऑस्कर पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री सुसान सारँडन (Susan Sarandon) यांनी शनिवारी शेतकरी चळवळीला पाठिंबा दर्शविला आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आपण असल्याचे सांगितले.

रिहानाने केलेल्या ट्विटनंतर अनेक जागतिक सेलिब्रिटी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी भारतामधील निषेध करणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शविला. आता 74 वर्षीय सुसान यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाईम्सचे वृत्त शेअर केले आहे, ज्याचे शीर्षक आहे ‘भारतात शेतकरी आंदोलन का करीत आहेत?’. यासह सारँडन यांनी लिहिले आहे की, ‘मी भारतातील शेतकरी चळवळीच्या पाठीशी उभी आहे. हे शेतकरी कोण आहेत आणि ते का निषेध करीत आहेत ते इथे सविस्तर वाचा.’

स्वीडिश हवामान कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, अमेरिकन वकील आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसची यांची भाची मीना हॅरिस, अभिनेत्री अमांडा सेर्नी, गायक जय सीन, डॉ. झ्यूस आणि माजी चित्रपट अभिनेत्री मिया खलिफा यांनीही निषेध करणार्‍या शेतकर्‍यांचे समर्थन केले आहे. काल, शुक्रवारी यूएन मानवाधिकार (UN Human Rights) नेही शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केले. आपल्या ट्वीटमध्ये युएन मानवाधिकार आयोगाने अधिकाधिक संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा: युपी, उत्तराखंड आणि दिल्ली वगळता संपूर्ण देशात 3 तास चक्का जाम, पोलिसांकडून कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात)

याबाबत नुकतेच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्यात अडथळा आणू शकत नाही! असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.