Eddie Hassell: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडी हेसल याची गोळ्या घालून हत्या
Eddie Hassell (Photo Credit: Twitter)

Actor Eddie Hassell dies in Texas shooting: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता एडी हेसल (Eddie Hassell) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना टेक्सास (Texas) येथे शनिवारी मध्यरात्री घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एडी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला असताना 2 अज्ञात व्यक्तींना त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एडीच्या मृत्यूमुळे हॉलिवूड मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी टेक्सास पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

एडी हेसल हा 30 वर्षांचा असून तो शनिवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. प्रेयसीच्या दरवाज्यात असताना 2 अज्ञात व्यक्ती मोटारसायकल बसून त्याच्याजवळ आले. त्यानंतर त्यांनी एडीच्या पोटावर गोळ्या झाडल्या. दरम्यान, एडी दरवाज्यात विव्हळत पडल्याचे त्याच्या प्रेयसीने पाहिल्यानंतर त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डेडलाईनने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Bam Bholle Song Out: 'लक्ष्मी' चित्रपटामधील 'बम भोले' गाणं प्रदर्शित; लाल साडीतील अक्षय कुमार याचा जबरदस्त डान्स पाहून चाहतेही चक्रावले

एडीने 2004 मध्ये बर्थ ऑफ इंडस्ट्री या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने 2012, जॉब्स, हाऊस ऑफ डस्ट, बॉर्न टू रेस फास्ट ट्रॅक यांसारख्या चित्रपटात त्याने अभिनय केला आहे. परंतु, 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द किड्स् आर ऑल राइट’ या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळवून दिली आहे. तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता.