बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘लक्ष्मी’ (Laxmmi) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वात बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला होता. अक्षय कुमारने (Akshay Kumar) या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यातच या चित्रपटामधील पहिले गाणे बम भोले मंगळवारी (3 नोव्हेंबर) प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यावरील अक्षय कुमारचा डान्स पाहून त्याचे चाहत्यांसह अनेकजण चक्रावून गेले आहेत.
नुकताच प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी ’ चित्रपटामधील पहिले गाणे बम भोले सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात अक्षय कुमारचा लूक सर्वांनाच चक्रावून टाकणारा आहे. या व्हिडिओत अक्षय कुमारने लाल रंगाची साडी नेसली असून हातातही लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपट दक्षिणात्य चित्रपट 'कंचना'चा रिमेक आहे. हे देखीला वाचा- Milind Soman चं 55 व्या वाढदिवसा दिवशी समुद्रकिनारी Nude Run; सोशल मीडीयात पोस्ट केला फोटो
अक्षय कुमारची इंस्टाग्राम पोस्ट-
अक्षय कुमारचा धडकी भरवणारा डान्स अनेकांना पसंत आला आहे. या गाण्याला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. तर, अनेकांनी अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल 125 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.