Chadwick Boseman Dies Of Cancer: हॉलिवूडचा सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचे निधन; वयाच्या 43 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Chadwick Boseman (Photo Credit: Twitter)

हॉलिवूड सुपरस्टार चॅडविक बोसमन (Chadwick Boseman) याचे आज निधन झाले आहे. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. चॅडविक गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरने त्रस्त होता. मात्र, आज अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होते. मार्वेल स्टुडिओ फिल्मचा हे एक लाडके अभिनेते होते. त्यांच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

"चॅडविक हा एक खरा फायटर होता, तो आपले काम सांभाळत या आजाराशी 4 वर्ष लढले, मार्शल चित्रपटापासून ते 'डा 5' या चित्रपटापर्यंत, मारॅनीज् ब्लॅक बॉटम आणि बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले आणि 'ब्लॅक पँथर' या चित्रपटातील किंग टी' चला या पात्राने वेगळीच ओळख निर्माण करून दिली होती. या चित्रपटाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती, असे त्याच्या कुटुंबाने म्हटले आहे. हे देखील वाचा- 93rd Academy Awards: 'ऑस्कर्स अवॉर्ड्स 2021' मध्ये मतदानासाठी 819 पाहुण्यांची यादी जाहीर; भारतामधील हृतिक रोशन, आलिया भट्ट यांचा समावेश

ट्वीट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2020 संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरले आहे. तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी नुकसानदायक ठरले आहे. यावर्षी बरेच कलाकार पडद्याआड गेले आहेत. ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.