Avengers EndGame Box Office: एवेंजर्स एंडगेम सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसात तब्बल 1 अब्ज डॉलरची कमाई
Avengers: EndGame poster (Photo Credits: Marvel)

Avengers EndGame Box Office Collection: एवेंजर्स एंडगेम (Avengers Endgame) या सिनेमाची जगाला भूरळ पडली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जगभरात तब्बल 1 अब्ज डॉलरची कमाई करत या सिनेमाने कमाईचा जागतिक विक्रम केला आहे. ('Avengers Endgame'ला देखील ऑनलाईन पायरसीचे ग्रहण, 'Tamil Rockers' वर डाउनलोड लिंक्स उपलब्ध)

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'एवेंजर्स एंडगेम' सिनेमाने तब्बल 1186 कोटींची कमाई केली होती. सिनेमाचे सुमारे 1 मिलियन तिकीट्स प्रीबुक झाले होते.

तरण आदर्श ट्विट:

Avengers Endgame चे पाच विक्रम

# विकेंडला जगभरात तुफानी कमाई- 1.2 बिलियन डॉलर

# अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वाधिक विकेंड कमाई- 350 मिलियन डॉलर

# जगभरात सर्वाधिक विकेंड कमाई- 859 मिलियन डॉलर

# अवघ्या पाच दिवसात 1 बिलियन डॉलरहून अधिक कमाई.

# चीनमध्ये जबरदस्त ओपनिंग- 330.5 मिलियन डॉलर.

कमाईचा हा आकडा आता कितीपत वाढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.