हॉलीवुड: 'एवेंजर्स :एंडगेम' (Avengers: Endgame) या चित्रपटाच्या लाखो फॅन्सची प्रतीक्षा नुकतीच संपली.२६ एप्रिलला प्रदर्शित झालेली ही फिल्म आजवरच्या अनेक हिट्सचे रेकॉर्ड मोडत मोठा बिजनेस करत आहे,या फिल्मची तिकीट मिळावण्यासाठी फॅन्सचे शर्थीचे प्रयत्न चालू होते ज्यात यशस्वी झालेल्यांनी या बहू प्रतिक्षीत मुव्हीचा मोठ्या पडद्यावर आस्वाद घेतला तर तिकीट न मिळालेल्यांनी ऑनलाईन मार्ग स्वीकारला . 'हॉलीवूड क्लासिक' Avengers: Endgame भारतात प्रदर्शित होण्याच्या तब्बल 48 तास आधीच 'तामिळ रॉकर्स' (Tamil Rockers) या कुख्यात पायरसी (Piracy) वेबसाईटची शिकार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Tamil Rockers वेबसाईटवर या सिनेमाची कॅमेरा प्रिंट डाऊनलोड करू शकणाऱ्या फ्री लिंक्स (Free Download Links) उपलब्ध करून ऑनलाईन पायरसीला प्रोत्साहन देत असल्याचे सांगण्यात येतेय. काही दिवसा पूर्वी या फिल्म मधील काही दृश्य अशाच प्रकारे लीक झाली होती याला रोखण्यासाठी दिग्दर्शक (Director) रुसो बंधूंच्या (Ruso Brothers) जोडीने आपल्या ट्विटर अकाउंट वरून फॅन्सना एक पत्र लिहीत हे व्हिडीओज पसरवू नका असे आवाहन केले होते.
Ruso Brothers ट्विट
Screenshot. Share. #DontSpoilTheEndgame pic.twitter.com/Y5l6oS5QKx
— Russo Brothers (@Russo_Brothers) April 23, 2019
एका दशकापासून सुरु असलेल्या एवेंजर्स च्या सीरिज मधील एंडगेम हा शेवटचा भाग असणार आहे. शक्तिशाली थॅनोसच्या विरुद्ध आयर्नमॅन (Ironman), हल्क (Hulk) , कॅप्टन अमेरिका (Captain America), स्पाइडरमॅन (Spiderman) ,थॉर (Thor) , कॅप्टन मार्वल (Captain Marvel) आणि अँटमॅन (Antman) या उर्वरित सर्व मार्व्हल सुपरहिरोंचा हल्ला बोल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने इन्फिनिटी वॉर प्रमाणेच रॉबर्ट डाउनी (Robert Downey Jr), ख्रिस इव्हान्स (Chris Evans),ख्रिस हेमस्वर्थ (Chris Hemsworth),मार्क रफालो (Mark Ruffalo), पॉल रुड (Paul Rudd) आणि ब्रेय लार्सन (Brie Larson) ही मोठी कलाकारांची यादी पुन्हा एकत्र पाहायला मिळेल.
भारतात 'एवेंजर्स :एंडगेम' ही फिल्म 26 एप्रिलला प्रदर्शित होणार असून त्या आधीच या फिल्मचे सगळे शो बुक झालेले आहेत. प्रदर्शनाच्या आधीच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून दर सेकेंदाला 18 तिकिटांची विक्री करण्याचा विक्रमी रेकॉर्ड बुक माय शो ने नोंदवला आहे. Avengers Endgame ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी केली तब्बल 1186 कोटींची कमाई
प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या पूर्वीच तिकिटाच्या रूपात 90 मिलियन म्हणजे साधारण 630 करोडची विक्रमी कमाई झालेली आहे. या मध्ये भर पडून बॉक्स ऑफिसवर आणखी 40 करोडचा बिजनेस ही फिल्म करू शकते असा अंदाज इंडिया टुडे ने वर्तवला आहे.