Avengers Endgame ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी केली तब्बल 1186 कोटींची कमाई
Avengers Endgame (Photo Credits: Twitter)

हॉलिवूड सिनेमा एवेंजर्स एंडगेम (Avengers Endgame) आज भारतात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल फारच उत्सुकता आहे. भारतापूर्वी हा सिनेमा चीन (China) आणि युएई (UAE) या देशात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'एवेंजर्स एंडगेम' सिनेमाने तब्बल 1186 कोटींची कमाई केली आहे. केवळ चीनमध्ये सिनेमाला 545 कोटी 54 लाखांची कमाई करण्यात यश आले आहे.

भारतात या सिनेमाचा उत्साह अगदी दांडगा आहे. या सिनेमाचे सुमारे 1 मिलियन तिकीट्स प्रीबुक झाले आहेत. या सिनेमावर समीकक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रीया मिळाल्या असून भारतात देखील हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल, अशी आशा आहे. ('Avengers Endgame' ऑनलाईन पायरसीचा शिकार, 'Tamil Rockers' वर फ्री डाउनलोड लिंक्स झाल्या लीक!)

'एवेंजर्स एंडगेम' या सिनेमात रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस इवांस, मार्क रफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड आणि ब्री लार्सन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मार्व्हल सिरीजमधील हा अखेर सिनेमा असून 'एवेंजर्स इनफिनिटी वॉर' चा हा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. 'एवेंजर्स एन्डगेम' या सिनेमाचे दिग्दर्शन जो आणि एंथनी रूसो यांनी केले आहे.