Star Wars फेम हॉलिवूड अभिनेता Andrew Jack यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची बाधा
Andrew Jack (Photo Credits: Twitter)

Star Wars फेम हॉलिवूड अभिनेता Andrew Jack यांचं कोरोना व्हायरस संसर्गातून प्रकृती बिघडल्याने निधन झालं आहे. Andrew Jack हे 76 वर्षीय असून दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. दरम्यान Andrew Jack यांच्या निधनाची बातमी त्यांचे एजंट Jill McCullough यांनी दिली आहे. अ‍ॅन्ड्र्यू यांचे Chertsey येथिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. थेम्स च्या जुन्या हाऊसबोट मध्ये अ‍ॅन्ड्र्यू राहत होते. त्यांचा पत्नीवर विशेष होता. परंतू ते एकटे राहत होते. दरम्यान ते डायलेक्ट कोचदेखील होते. अशी माहिती Jill McCullough यांनी दिली आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. यामध्ये प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना कोरोना व्हायरस लक्ष्य करत असल्याने लहान मुलं, वयाच्या साठी ज्येष्ठ नागरिक कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण अधिक आहे.

अभिनेते Andrew Jack यांची पत्नी Gabrielle Rogers यांनी खास ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यासाठी शोकसंदेश लिहला आहे. ' Andrew Jack यांना दोन दिवसांपूर्वी कोव्हिड 19 ची बाधा झाल्याचं समजलं. त्यांना कोणत्याही वेदना होत नव्हता. त्यांनी अत्यंत शांत आणि वेदनारहित मृत्यूला कवटाळलं.' अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. Coronavirus: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेता क्रिस्तोफर हिवजू याला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून दिली माहिती

 Andrew Jack यांची पत्नी Gabrielle Rogers यांचं ट्वीट  

अभिनयासोबत Andrew Jack हे डायलेक्ट कोच होते. 'Men in Black: International', 'Thor: Ragnarok', 'The Lord of the Rings trilogy'सोबतच 'Avengers' च्या दोन सिनेमांमध्येही त्यांनी काम केले होते.