Holi Songs (Photo Credits: File Photo)

Holi Songs 2020: रंगाची उधळण करणारा होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीचा आनंद लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण घेत असतात. त्यामुळे या कलरफुल सणाची तयारी सर्वत्र सुरु झाली असेल. परस्परांमधील राग, द्वेष या भावना सोडून देऊन पुन्हा प्रेमाने एकत्र आणणरा हा सण सर्वांसाठीच खूप खास आहे. या खास सणाचा उत्साह वाढवतील होळीची ही खास गाणी. (Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा)

हिंदी-मराठी अशी ही गाणी होळीच्या रंगीत सणात अधिक रंग भरतील. तसंच ज्यांना होळी खेळायला आवडत नाही ते देखील होळीची ही गाणी ऐकून होळीचा सण सेलिब्रेट करु शकतात.

'लय भारी' सिनेमातील 'आला होळीचा सण' हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल.

जिनेलिया-रितेश देशमुख यांच्यावर चित्रीत झालेले 'धुवून टाक' सॉन्ग.

'ये जवानी है दिवानी' सिनेमातील 'बलम पिचकारी' गाणे ऐकून तुम्ही नक्कीच थिरकाल.

'सिलसिला' सिनेमातील 'रंग बरसे' हे एव्हरग्रीन सॉन्ग.

'वक्त' सिनेमातील अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा यांचे 'लेट्स प्ले होली.'

'कटी पतंग' सिनेमातील सुंदर गाणे 'आज ना छोडेंगे.'

यंदा जगभरात कोरोना व्हायरसची दहशत असून आपल्या देशावरही त्याचे सावट आहे. त्यामुळे अनेकजणांच्या होळीचे रंग खेळण्याच्या उत्साहावर पाणी फिरु शकते. पण होळीचा उत्साह कायम राखण्यात ही गाणी तुमची नक्कीच मदत करतील.

होळीची ही गाणी तुम्हाला नक्कीच आनंद देतील आणि तुमचा होळीचा सण अधिकच स्पेशल करतील. ताल धरायला लावणारी ही गाणी तुमच्या playlist मध्ये नक्की असू द्या.