सपना चौधरी कोलकाता येथे आपल्या डान्सच्या ठुमक्यांनी सर्वांना करणार घायाळ, चाहत्यांध्ये उत्सुकता शिगेला
सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

हरियाणाची (Haryana) सुपर डान्सर सपना चौधरी (Sapna Chodhary) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तसेच दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे. तर सपना हिच्या डान्समधील अदा सर्वांना घायाळ करणाऱ्या असतात. त्यामुळे आता येत्या 16 एप्रिलला सपना कोलकाता (Kolkata) मध्ये चाहत्यांच्या दिलाचा ठोका चुकवायला येत आहे.

सपना युट्युब पासून ते सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तसेच युपी, हरियाणा आणि बिहारसह अन्य राज्यात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आता लवकरच ती कोलकाता येथे आपल्या डान्सच्या अदांना चाहत्यांवर भुरळ पाडण्यासाठी येणार आहे. यामुळे कोलकाता येथील तिच्या चाहत्यांचा उत्साह अगदी शिगेला जाऊन पोहचला आहे. परंतु हा एक प्रायव्हेट शो असणार आहे.(हेही वाचा-सपना चौधरी हिने मित्रासोबतच्या नात्याला दिले प्रेमाचे नाव, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

बॉलिवूडमध्ये सुद्धा पदापर्ण केल्यानंतर सपना हिचे फॅनफॉलोअर्स सुद्धा वाढले आहेत. तर दोस्ती के साईट इफेक्टस या बॉलिवूड चित्रपटात सपना हिने पोलीस लेडीची भुमिका साकारली होती. तसेच टिकटॉक अॅपवर सुद्धा सपना नवीन व्हिडिजोच्या माध्यमातून आपल्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना दाखवत असते.