Happy Birthday Rajinikanth: संपूर्ण भारताचे स्टाईल आयकॉन असणारे रजनीकांत यांचं आज वाढदिवस. सुरुवातीला हमालीचं काम करणारा, नंतर बस कंडक्टर म्हणून काम करणारा याच मराठी माणसाने त्याच्या आयुष्यात इतका संघर्ष केला की बघता बघता तो कधी दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार बनला हे कळलंच नाही. इतकंच नव्हे तर साऊथमधील लोक त्याला देव मनात त्याची पूजा करू लागले. अशा या रजनीकांत विषयी, त्याच्या का खास दिवशी जाणून घेऊया या काही थक्क करणाऱ्या गोष्टी.
रजनीकांतचे खरे नाव शिवाजी गायकवाड असून त्याचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू मधील मराठा हेंद्रे पाटील कुटुंबात झाला होता.
रजनीकांतच्या स्टाईलचा संपूर्ण देश चाहता आहे. आणि म्हणूनच त्याचा जन्मदिवस म्हणजेच 12 डिसेंबर ही तारीख जागतिक स्टाईल दिन म्हणून साजरा केला जातो.
सुपरस्टार रजनीकांत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा फॅन आहे. म्हणूनच त्याने आपल्या घरात महाराजांचे भले मोठे पेंटिंग लावले आहे.
जगातील सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असणारा अभिनेता म्हणून गिनीज बुकात रजनीकांतच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतात त्याच्या नावावर सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत.
हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन याच्यानंतर आशिया खंडातील सर्वाधिक मानधन (26 कोटी – शिवाजी द बॉस) घेण्यासाठी रजनीकांतच्या नावाची नोंद आहे.
रजनीकांत वेळेबाबत खुप शिस्तीचा असून पहाटे पाच वाजता उठून रोज योगा करतो. शूटिंगच्या अगोदर तो नेहमी हजर असतो आणि संध्याकाळी तासभर चालण्याचा व्यायाम करतो. तसेच रात्री 9 नंतर तो कोणालाच भेटत नाही.
त्याच्या बाबतीत असलेली सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 1995 पासून त्याच्या प्रत्येक चित्रपटानंतर तो काही दिवस हिमालयात जातो. तिकडे गेल्यानंतर ऋषिकेश येथील एका हॉटेलमध्ये तो नेहमीच्या ठरलेल्या एकाच खोलीमध्ये मुक्कामाला असतो.
भारत सरकारने रजनीकांतला 2000 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविले आहे. त्याचसोबत जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीनमध्ये जगातील प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये स्थान असे विविध सन्मान रजनीकांतला आजपर्यंत मिळाले आहेत.