Gene Deitch (Photo Credits: Wikimedia Commons)

जगप्रसिद्ध कार्टून टॉम अॅन्ड जेरी (Tom & Jerry), पोपाय द सेलर मॅन (Popeye the Sailor Man) सारख्या शानदार कार्टून फिल्मचे दिग्दर्शक आणि निर्माते जीन डाइच (Gene Deitch) यांचे 95 व्या वर्षी निधन झाले आहे. जीन डाइच यांचा 16 एप्रिल या दिवशी त्यांच्या घरात मृत्यू झाला होता. मात्र 18 एप्रिलला त्यांचे निटकवर्तीय हिमल यांनी 18 एप्रिलला याबाबत पुष्टी केली. जगभरातील प्रत्येकाला आपल्या कार्टूनचे वेड लावणारे जीन हे यापूर्वी अमेरिकेच्या सेनेत दाखल झाले होते. तेथे जीन पायलटांना ट्रेनिंग आणि सेनेसाठी ड्राफ्टमॅन म्हणून काम करत. मात्र आरोग्यासंबंधित समस्यांमुळे त्यांनी 1994 मध्ये त्यांना सेनेतून बाहेर करण्यात आले.

त्यानंतर जीन यांनी अॅनिमेशन क्षेत्राकडे वळत त्यांनी टॉम अॅन्ड जेरी सारखे हिट कार्टून जगभरात प्रसिद्ध करण्यात त्यांना यश आले. अॅनिमेशन मध्ये जीन यांनी फार कमी काम केले. मात्र टॉम अॅन्ड जेरी आणि पॉपाय द सेलर मॅन मुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. जीन यांना त्यांच्या उत्तम दिग्दर्शनामुळे चार वेळा नॉमिनेशन सुद्धा मिळाले होते. ऐवढेच नाही तर 1967 मध्ये चित्रपट मुनरोसाठी ऑस्करचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जीन यांनी टॉम अॅन्ड जेरीचे एकूण 13 एपिसोड बनवले होते.(Oscars 2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट,वॉकिन फीनिक्स बेस्ट अॅक्टर) 

टॉम अॅन्ड जेरी हे असे एक कार्टून आहे जे लहानांपासून ते वयोवृद्धांना पहायला आवडते. या कार्टूनची कथा ही उंदिर आणि मांजर यांची असून त्यांच्या खोडकर स्वभावाची आहे. या कार्टूनमधील पात्र सर्वांनाच आवडत असून मनाला आकर्षित करतात. यामध्ये द्वेष आणि प्रेमाची भावना एकमेकांसाठी दिसून येते. हे कार्टून कोणत्याही डायलॉग्स शिवाय फक्त मुझ्यिकच्या तालावर आपली कथा प्रेक्षकांसमोर सादर करते.