मराठी सिनेसृष्टीतील 'विनोद खन्ना' अशी ओळख मिरवणार्या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं काही दिवसांपूर्वी पुण्यात निधन झाले. रविंद्र महाजनी यांचं सारं कुटुंब मुंबई मध्ये आणि केवळ राविंद्र महाजनी पुण्यात वेगळे का राहत होते? या प्रश्नापासून ते बाप-लेकामध्ये मतभेद होते का? इथंपर्यंत अनेक गोष्टींची या दरम्यान चर्चा झाली. रविंद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. घरातून दुर्गंध आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी कळते यावरून अनेकांनी त्यांचा लेक आणि अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) ट्रोल केले आहे. यावर पहिल्यांदा गश्मीरने प्रतिक्रिया देत इंस्टाग्राम वर एक स्टोरी पोस्ट केली आहे.
गश्मीर महाजनीची पोस्ट
गश्मीरने इंस्टा पोस्ट मध्ये आपल्या भावना व्यक्त करताना लिहलं आहे की ' स्टार ला स्टार राहू द्या. आम्ही शांत राहणंचं पसंत करू. त्यामुळे आमच्याबद्दल द्वेष निर्माण होत असेल तर तेही मला मान्य आहे. मृताच्या आत्म्याला शांती प्रदान होवो. तुमच्यापेक्षा जास्त ते आम्हांला माहित होते ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. भविष्यात योग्य वेळ आली की याबद्दल कदाचित व्यक्त होईन.'
अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील काही दिवसांपूर्वी चाहत्यांकडून रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर व्यक्त केल्या जाणार्या भावनांबद्दल संताप व्यक्त केला होता. नक्की वाचा:Ravindra Mahajani Dies: मराठीतील 'विनोद खन्ना' ओळख असणारे अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनावर CM Eknath Shinde, Sharad Pawar यांनी व्यक्त केला शोक!
शनिवार 15 जून दिवशी पुण्यात भाड्याने राहत असलेल्या एका फ्लॅट मध्ये रविंद्र महाजनी मृतावस्थेमध्ये आढळले. त्यानंतर पोलिसांनी दार तोडून त्यांचं शवविच्छेदन केले. पुण्यातच रविंद्र महाजनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा गश्मीर त्याचे कुटुंबीय पुण्यात आले होते. पोस्ट मार्टमच्या अहवाला नुसार रविंद्र महाजनी यांचा मृत्यू गुरूवारी झाला असावा. पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये त्यांच्या शरीरावर जखमा, खूणा नसल्याचं सांगण्यात आलं आहे. रविंद्र महाजनी हे 'मुंबईचा फौजदार', 'लक्ष्मी','गोंधळात गोंधळ' यासह मराठी, हिंदी, गुजराती सिनेमात झळकले होते.