Firoz Nadiadwala Wife Arrested by NCB: बॉलिवूड चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील घरावर एनसीबीकडून रविवारी छापेमारी करण्यात आली. एनसीबीकडून फिरोज यांना ड्रग्ज प्रकरणी (Drug Case) समन्स सुद्धा पाठवण्यात आले होते. त्याचसोबत त्यांची पत्नी हिची सुद्धा चौकशी केली गेली. याच पार्श्वभूमीवर आता एनसीबीकडून फिरोज यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच एका रिपोर्टनुसार, नाडियाडवाला यांच्या घरी तपास केला असता तेथे काही प्रमाणात ड्रग्ज सुद्धा मिळाल्याचे बोलले जात आहे.(Showik Chakraborty Files Bail Application: रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक याने मुंबईतील NDPS कोर्टात दाखल केला जामिन अर्ज)
ANI च्या रिपोर्टनुसार, एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे येथे आज एकत्रित छापेमारी केली. फिरोज नाडियाडवाला यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये फिर हेरा फेरी, आवारा पागल दीवाना, वेलकम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांतची बहिण प्रियंका, मितू यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी रिया चक्रवर्ती हिची बॉम्बे हायकोर्टाला विनंती)
Summon issued to film producer Firoz Nadiadwala: Narcotics Control Bureau (NCB) #Mumbai https://t.co/sVIpyGtqry
— ANI (@ANI) November 8, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु आहे. सातत्याने एनसीबीकडून या प्रकरणी वेळोवेळी कारवाई केली जात आहे. यामध्ये काही बॉलिवूड मधील कलाकारांची नावे सुद्धा समोर आली असून त्यांची ही चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. तर सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली होती.