Producers Guild of India कडून मालिका आणि सिनेक्षेत्रात काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना, पण 'या' कडक नियमावलीचं करावं लागणार पालन!
Producers Guild Of India (Photo Credits: Document)

भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन लागू होऊन आता दोन महिने उलटले आहेत. या काळात सारे व्यवसाय ठप्प होते दरम्यान मनोरंजन क्षेत्रदेखील याला अपवाद नव्हते. मात्र आता हळूहळू विसकटलेली घडी सुधारण्याचं काम सुरू झालं आहे. काही दिवसांपूर्वी सिनेक्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींनी पोस्ट प्रोडक्शनचं काम आणि पावसाळ्यापूर्वी काही शूटींगचं काम पूर्‍ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्याला आता राज्य सरकारनेही मंजुरी देत मनोरंजन क्षेत्राला पुन्हा गती मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. Producers Guild of India यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत कामावर पुन्हा रूजु होणार्‍या सिनेक्षेत्र आणि मालिकांमधील कर्मचार्‍यांना एक SOP म्हणजे कडक नियमावली जारी केली आहे.

दरम्यान मागील दोन महिन्यांपासून ठप्प पडलेल्या मनोरंजन क्षेत्राने कोट्यावधींचं नुकसान भोगलं आहे. अनेक सिनेमांचं चित्रिकरण रखडलं आहे तर काहींनी प्रदर्शनाच्या तारखा लांबणीवर टाकल्या आहेत. लॉक डाऊनमुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत चित्रपट; INOX, PVR ने व्यक्त केली नाराजी, निर्मात्यांना काही काळ थांबण्याची विनंती.

Producers Guild of India ट्वीट  

दरम्यान कॅमेरा पासून मेकअप पर्यंत सिनेक्षेत्राशी निगडीत प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे नियम आहेत. तसेच 60 वर्षापेक्षा अधिकच्या व्यक्तींना सेटवर न बोलण्याचे आदेश आहेत. शक्य त्यांना वर्क होम द्यावे. सेट्सवर 45 मिनिटं आधी पोहचून हेल्थ चेकअप करावं लागणार आहे.

Lockdown: चित्रीकरण सुरु करण्याचा विचार; पाहा CM Uddhav Thackeray यांच्या संवादातले महत्वाचे मुद्दे - Watch Video 

नव्या नियमांसह काम करणं याची सिने जगताला आता सवय करून घ्यावी लागणार आहे. अद्याप कोरोनावर ठोस लस नसल्याने खबरदारी घेऊनच बाहेर पडण्याचं आवाहन सरकारकडून देण्यात आलं आहे.