इंडियन आयडल (Indian Idol) हर हर शंभू गाणं (Har Har Shambhu) गाऊन रातोरात सिंगर झालेली फरमानी नाजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. फरमानी नाजच्या संपूर्ण कुटुंबियांवर पोलिस चौकशीची टांगती तलवार आहे. फरमानीच्या भाऊ अरमानला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असुन पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तरी या दरोड्यात फरमानीचे वडील आणि जीजा म्हणजेचं बहिणीचा नवरा देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गायक फरमानी नाजचे वडील आरिफ टोळी तयार करून लोखंडी बार लुटायचे. टेहरकी गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते, त्यासाठी सुमारे 25 क्विंटल लोखंड आणल्या गेलं होतं. गेल्या महिन्याच्या या संपूर्ण लोखंडी मालाची चोरी झाली. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू करून 8 चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 200 किलो लोखंड आणि दरोड्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Police) अटक केलेल्या या आठ चोरट्यांमध्ये फरमानी नाजच्या भावाचा समावेश असुन या दरोड्याचे सुत्रधार फरमानीचे वडील आणि जिजा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या दरोड्यानंतर हे दोघेही फरार आहे. तरी पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असुन सध्या फरमानीचे वडिल आणि जिजाला शोधत आहेत. (हे ही वाचा:- Singer Palak Muchhal & Mithoon Sharma: कौन तुझे यु प्यार करेगा जैसे मै करती हु म्हणतं गायिका पलक मुच्छलची सुप्रसिध्द गायक मिथून बरोबर लगिनगाठ!)
View this post on Instagram
'हर हर शंभू' या गाण्यातून इंडयन आयडलच्या स्टेजवरुन फएम कमावणारी प्रसिद्ध गायिका फरमाणी नाझने घर बांधले आणि घरी स्टुडिओही उघडला. इंडियन आयडल शो दरम्यान फरमानीला अनेक मोठ मोठ्या गायकांबरोबर गाणं गाण्याची संधी मिळाली. तरी फरमानीच्या जवळपास संपूर्ण कुटुंबियांवर आला दरोडेखोरीचा शिक्का लागला आहे.