S P Balasubrahmanyam: प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये दाखल
S P Balasubrahmanyam (PC - Facebook)

S P Balasubrahmanyam: प्रसिद्ध पार्श्वगायक (Playback Singer) एसपी बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. बालासुब्रमण्यम यांना चेन्नईती एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. यासंदर्भात एमजीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, बालासुब्रमण्यम यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली होती. यात त्यांनी आपल्या मित्रांना फोन न करण्याची विनंती केली होती. याशिवाय दोन-चार दिवसात डिस्चार्ज मिळेल, असंही म्हटलं होतं.

बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून छातीत त्रास होत होता. तसचं थोडा खोकला आणि तापही येत होता. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर कोरोनाचं निदान झालं. डॉक्टरांनी मला होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. मात्र, मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला, असंही बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं. (हेही वाचा - Sonu Sood Helps UP Girl: अभिनेता सोनू सूद ने 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत)

प्राप्त माहितीनुसार, एसपी बालासुब्रमण्यम 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होती. परंतु, 13 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीमध्ये दाखल करण्यात आलं.